शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड; रामदास मारणेसह सहा जणांना बेड्या

  • Written By: Published:
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड; रामदास मारणेसह सहा जणांना बेड्या

Sharad Mohol Muder case : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसानी जवळपास १३ जणांना अटक केली. दरम्यान, आता पोलिसांनी मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसकल्या आवळल्या आहेत. मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणे (Ramdas Marane) उर्फ ​​वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल येथील एका फार्महाऊसवर छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शिंदे-फडणवीस काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; दोन बडे नेते भाजप-सेनेच्या वाटेवर 

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारी रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुरुवातीला आठ आरोपींना अटक केली होती. दरम्यान, शनिवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्यांना शस्त्रे आणि पैसे कोणी पुरवले, याचाही पोलिस तपास करत आहेत. याचा तपास करत असताना पनवेल पोलिसांच्या पथकाने पनवेल आणि वाशी येथील मोहोळच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. यात तीन मुख्य आरोपी आणि इतर संशयित आहेत. के पनवेल किंवा वाशी येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पनवेल पोलिसांनी पनवेल येथील फार्म हाऊसवर कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या आरोपींना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.

बिग बीं’नी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा! 

आरोपी साहिल उर्फ ​​मुन्ना पोळेकर हा मोहोळ हत्याकांडाचा सूत्रधार मानला जात होता, मात्र या खून प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. पोलिस तपासादरम्यान आरोपी मन्ना पोळेकर याच एक रेकॉर्डिंग समोर आलं होतं. ज्यावेळी पोळेकर कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असताना त्याने एका नातेवाईकाकडून सिमकार्ड घेतले होते. या सिमकार्डवरून त्याने संतोष कुरपे याला फोन केला. त्यावर, गेम केला, मास्टरमाईंड सांगा, असं संभाषण झालं होतं. दरम्यान, कुरपेही पोलिसांच्या ताब्यात असून मास्टरमाईंड म्हणून रामदास मारणेचं नाव समोर आलं.

कोण होता शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा पुण्याचा कुख्यात गुन्हेगार होता. शरद मोहोळवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. शरद मोहोळ याच्यावर दहशतवादी सिद्दिकीची हत्या केल्याचा आरोप असून सिद्दिकीची येरवडा कारागृहात गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज