बिग बी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!

बिग बी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!

Amitabh Bachchan Surgery: बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. पण यंदा बिग बी कोणत्याही कलाकृतीमुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. आपल्या नव्या ब्लॉग पोस्टमधून हाताच्या शस्त्रक्रियेविषयी चाहत्यांना सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


‘बिग बीं’नी याविषयी सांगत असताना म्हटले आहे की, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग लाँच होण्यापूर्वी ते खिलाडी कुमारसोबत शूटिंग करत होते. या दरम्यान त्यांनी काही फोटोशूट देखील केले आहे. या दरम्यान त्यांनी खिलाडीसोबत (Akshay Kumar) त्यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेविषयी संपूर्ण चर्चा केली. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो देखील त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, बिग बी यांच्या मनगटावर पट्टी बांधलेली पाहायला मिळत होती. परंतु, हाताच्या शस्त्रक्रियेबद्दल त्यांनी अधिक काही माहिती दिली नाही.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की, ‘आयएसपीएल आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता सगळ्या मालकांना आणि सदस्यांना एका पिक्चर फ्रेममध्ये आणणे अतिशय गरजेचे आहे. या सुंदर फोटो-मीट शूटमध्ये आम्ही खूप धमाल केली आहे… या दरम्यान मी माझ्या काही मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत खूप छान खूप वेळ घालवला आहे.. खिलाडी या टीम मालकांपैकीच एक आहे.. या शूट दरम्याने त्याने मला माझ्या हाताच्या शस्त्रक्रियेविषयी विचारणा केली. आम्ही यावर बरीच चर्चा देखील केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

आयएसपीएल ही भारतातील पहिली टेनिस बॉल टी-10 क्रिकेट स्पर्धा आहे, जी स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. 2 मार्च ते 9 मार्च दरम्यान हे रंजक अशी सामने मुंबईमध्ये होणार आहे. यामध्ये अनेक कलाकार स्वतःच्या टीम्समध्ये सामने खेळवणार असल्याचे सांगितले आहे. अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यासह खिलाडी कुमार, हृतिक रोशन, सुरिया आणि राम चरण यांच्या टीम्सचा देखील या सामन्याला हजेरी लावणार आहेत.

कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; रिलीजच्या 3 दिवशी केली एवढी कमाई

बिग बीं’नी सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या आगामी सिनेमात ते प्रभास, दीपिका पदुकोण यांच्या सोबत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाला ‘कल्की २९८९ एडी’ असे या सिनेमाचे नाव असून, या सिनेमातील त्यांचे काही लूक आणि टीझर चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचा टीझर देखील खूप गाजला होता. या सिनेमात सायफाय कथानक बघायला मिळणार आहे. वयाच्या ८०चा टप्पा पार केलेले बिग बीं’ या सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स करत असताना पाहायला आहेत. मात्र, आता त्यांच्या हातावर सर्जरी झाल्याने चाहत्यांना त्यांची फार काळजी वाटत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube