Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर

Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर

Pushpa 2 Vs Singham 2: बॉलीवूड (Bollywood) असो किंवा दक्षिण बॉक्स ऑफिसवर (box office) चित्रपटांचा संघर्ष सामान्य आहे. पण, जेव्हा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे लागलेले असते. (Bollywood Vs South 2024) याचा थेट परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. अशा परिस्थितीत 2024 सालचा मोठा संघर्ष होणार बघायला मिळणार आहे. या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ (pushpa 2 ). याबाबत चाहत्यांची उत्कंठा बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता अल्लू अर्जुन बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबत थेट पंगा घेणार असल्याचे दिसणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनचा नवा लूक शेअर केला आहे. यात अल्लू अर्जुन रागावलेला आणि सिगारेटचा धूर उडवताना दिसत आहे. यात त्याचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आलेला नसून रक्तपाताची झलक नक्कीच दाखवण्यात आली आहे. त्याच्या हातावर रक्ताचे ठिपके, बोटात अंगठ्या आणि मोठ्या नखांवर नेलपेंट दिसत आहे. यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.सध्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया जोरदार व्हायरल होत आहेत. आता हे पोस्टर शेअर करण्यासोबतच अल्लू अर्जुनची 2024 साली अजय देवगणसोबत टक्कर होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

‘पुष्पा 2’ 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे , आणि त्याच दिवशी अजय देवगणचा ‘सिंघम 3’ ही रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत दोघांची रिलीज डेट सारखीच आहे. यामुळे साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा: द राइज’ हिट झाल्यानंतर, चाहते आता त्याच्या सीक्वल ‘पुष्पा: द रुल’बद्दल खूप उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोघांमधील होणाऱ्या काटे की टक्कर मध्ये चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

‘पुष्पा 2’ आणि ‘सिंघम 3’ च्या काटे की टक्करबद्दल तीव्र प्रतिक्रिया देत असतील. एकाने लिहिले, ‘आता पुष्पा राज्य करणार… तो झुकणार नाहीस.’ तर दुसर्‍याने लिहिले की, ‘मोठ्या संघर्षासाठी सज्ज व्हा.’ तर आणखी एका यूजरने लिहिले, ‘पुष्पा २ समोर सिंघम हवेत उडेल, का? सिंघममध्ये तीच व्यक्ती दिसणार आहे?, जी आपण आधीच पाहत आलो आहोत. पुष्पा द रुल, अपने लिए नवीन आहे आणि फक्त पहिला भाग पाहिला आहे.

आमदार पात्रतेच्या निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत! म्हणाले, ‘जब बंदूक न हुई, तब तलवार होगी’

सध्या ‘पुष्पा 2’ आणि ‘सिंघम 3’ हे 2024 मध्ये प्रदर्शित होणार्‍या मोठ्या चित्रपटांपैकी एक मानले जात आहेत. अजय देवगण आणि अल्लू अर्जुन यांची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर कोण जिंकते हे पाहणे मनोरंजक ठरेल. दोन्ही स्टार्सची फॅन फॉलोइंग पाहता 2024 मध्ये 15 ऑगस्टला मोठा संघर्ष होणार आहे, असा अंदाज लावला जाऊ शकतो. बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बॉलिवूड विरुद्ध साऊथ असा सामना रंगणार आहे.

मात्र, ‘सिंघम 3’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि अजय देवगण सारखे स्टार्स यात दिसणार आहेत. त्याचबरोबर ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत दक्षिणेतील अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज