आमदार पात्रतेच्या निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत! म्हणाले, ‘जब बंदूक न हुई, तब तलवार होगी’

आमदार पात्रतेच्या निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत! म्हणाले, ‘जब बंदूक न हुई, तब तलवार होगी’

MLA Disqualification Case Kiran Mane Reaction: शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णयाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलाय. शिवसेना पक्ष (Shivsena) हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच असल्याचा महत्त्वाचा निर्णय नार्वेकर यांनी दिलाय. पण आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्यात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले आहेत. एकनाथ शिंदेंसह त्यांच्याबरोबर गेलेले आमदार अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे गट आक्रमक काही दिवसांपूर्वी शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर थेट पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

किरण माने यांची पोस्ट
क़त्ल हुए जज़्बात की क़सम खाकर, बुझी हुई नज़रों की कसम खाकर, हम लड़ेंगे साथी… हम लड़ेंगे… जब बंदूक़ न हुई, तब तलवार होगी… जब तलवार न हुई, …लड़ने की ‘लगन’ तो होगी ! लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की ‘ज़रूरत’ तो होगी !! हम लड़ेंगे साथी… हम जीतेंगे, ज़ाहिर है कि हम ही जीतेंगे, जो दूर बड़ी… और मुश्किल है, उस मंज़िल तक हम पहुंचेंगे !


तर आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, औरंगजेबाने या मुलूखावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलूख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता ‘हिसकावणं’ सोपं असतं… पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो ! अभिनेत्यांच्या या दोन्हीही पोस्टनं चाहत्यांचा लक्ष वेधलं आहे.

Satyashodhak : अजित दादांच्या मागणीला CM शिंदेचा हिरवा कंदील, ‘सत्यशोधक’ चित्रपट टॅक्स फ्री

गेल्या काही दिवसांपूर्वी मराठामोळा अभिनेता किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्या किरण माने यांनी सोशल मीडियावर धडाकेबाज पोस्ट शेअर करत त्यांच्या राजकीय प्रवेशाची माहिती सर्वाना दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज