Bollywood मधील तिसरी-चौथी पिढीही गाजवतीय घराण्यांची नावं; ‘या’ दिग्गजांचे नातूही अभिनयात

Bollywood मधील तिसरी-चौथी पिढीही गाजवतीय घराण्यांची नावं; ‘या’ दिग्गजांचे नातूही अभिनयात

Bollywoods Leading Families : वडिल अभिनय क्षेत्रात असले की, मुलांना आपोआपचं ते वातावरण मिळतं. त्यांच्यावर तसे संस्कार होतात. त्यामुळेच अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्रींच्या पुढच्या पिढ्या देखील याच क्षेत्रात पाऊल ठेवतात. याची अनेक उदाहरण आपल्याला हिंदीसह मराठीमध्ये देखील पाहायला मिळतात. अशी बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांच्या घराण्यांतील तिसरी-चौथी पिढीही अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात घराण्यांची नावं गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणते आहेत हे घराणे आणि त्यांची पुढची पीढी पाहूयात…

काँग्रेसचा ‘जनसंवाद’ यात्रेतून मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘जनतेच्या पैशातून मित्रांचे खिसे भरले’

त्यात नुकतचं चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत असलेल्या धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेते सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओल आहे. तो दोनो या चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच चित्रपटाचा दिग्दर्शक अवनीश बडजत्या हा देखील दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तो ताराचंद बडजात्या यांचा पणतू आहे. ज्यांनी राजश्री प्रोडक्शनची स्थापना केली. तर राज कुमार बडजात्या यांचा नातू आणि सूरज बडजात्या यांचा मुलगा आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे मागतात ते आरक्षण टिकेल का? संभाजीराजेंचा सवाल

त्याचबरोबर यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री पुनम ढिल्लन यांची मुलगी पलोमा देखील चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तो अर्चिज या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे अवनिश प्रमाणेच रणबीर कपूर देखील चित्रपटात येणारा कपूर घराण्यातील चौथी पीढी आहे. तो पृथ्वीराज कपूर यांचा पणतू, राज कपूर यांचा नातू आणि ऋषी कपूर यांचा मुलगा आहे.

त्यामुळे कपूर, बडजत्या, देओल, बच्चन आणि ढिल्लन या स्टार कुटुंबातील पुढील तिसरी-चौथी पिढीही अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात घराण्यांची नावं गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube