काँग्रेसचा ‘जनसंवाद’ यात्रेतून मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘जनतेच्या पैशातून मित्रांचे खिसे भरले’

काँग्रेसचा ‘जनसंवाद’ यात्रेतून मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘जनतेच्या पैशातून मित्रांचे खिसे भरले’

Congress Janasamwad Yatra : महाराष्ट्र काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंवाद पदयात्रेचा आज सहावा दिवस आहे.सांगली जिल्ह्यात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील कन्हान येथे जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली.

नाना पटोले यांची पारशिवनी येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश स्वतंत्र झाल्यापासून ६७ वर्षांत सर्व सरकारांनी मिळून ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले पण मोदी सरकारने मागील ९ वर्षात तब्बल १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Maratha Reservation : मनोज जरांगे मागतात ते आरक्षण टिकेल का? संभाजीराजेंचा सवाल

यावेळी ते पुढे म्हणाले की, केंद्रातील तानाशाही सरकारच्या विरोधात ही लढाई सुरु आहे. मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली, औषधे महाग केली, शेतीला लागणाऱ्या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढून मोदी त्यांच्या मित्रोंचे खिसे भरत आहेत. उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली.

मल्लिकार्जुन खर्गेंना G20 डिनरचे निमंत्रणच नाही, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि सत्तेत येताच मोदी सरकार संविधानच संपवायला निघाले. जनतेमध्ये केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तिघाडी सरकाबद्दल तीव्र नाराजी असल्याचे जनसंवाद यात्रेत लोकांशी संवाद साधताना स्पष्ट दिसत आहे. जनतेशी सुरु झालेला हा संवाद थांबणार नाही, १२ तारखेपर्यंत जनसंवाद यात्रा सुरु राहणार आहे, त्यानंतर पुन्हा एक यात्रा घेऊन आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube