परिक्षेतील गैरव्यवहारांना चाप बसणार; मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार नवा कायदा!

परिक्षेतील गैरव्यवहारांना चाप बसणार; मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार नवा कायदा!

देशभरातील सरकारी परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. युवक-युवती वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. मात्र आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकार यंदाच्या अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी अभिभाषणादरम्यान याबाबतची माहिती दिली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय आज (31 जानेवारी) अधिवेशनाला प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. या दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी सरकारच्या मोदी सरकारच्या विविध कामांचा लेखाजोखा मांडला. याचवेळी त्यांनी भरती परिक्षेमध्ये होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकार कडक कायदा बनवणार असल्याचे सांगितले.

Shilpa Shetty: ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड’ने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सन्मानित

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, माझ्या सरकारला परीक्षांमध्ये होणारे गोंधळ आणि गैरप्रकार यामुळे विद्यार्थी आणि तरुणांना होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे. त्यामुळेच परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आणि घोटाळे रोखण्यासाठी सरकारने नवीन कायदा बनवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचमुळे या अधिवेशनात हा कायदा येण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाची ‘लढाई’ पुन्हा न्यायालयात : ‘सगेसोयरे’ अधिसुचनेला ओबीसी संघटनेकडून आव्हान

आणखी काय म्हणाल्या मुर्मू?

नव्या संसदेत माझे पहिलेच अभिभाषण आहे. संसदेच्या या नव्या सभागृहात एक भारत-श्रेष्ठ भारताची भावना आहे.  जगभरातील संकटांमध्ये भारत सर्वात वेगाने विकसित अर्थव्यवस्था होत आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून देशाचा विकास दर वाढत आहे. गेल्या वर्षी सरकारने रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सर्व गोष्टींना सतत चालना दिली. नारीशक्ती विधेयक मंजूर केल्याबद्दल मी संसदेच्या सदस्यांचे अभिनंदन करते. माझे सरकार महिला धोरण विकासाच्या संकल्पना मजबूत करत आहे. असे म्हणत सरकारच्या विविध योजनांच्या लेखाजोखा मांडत द्रौपदी मुर्मू यांनी सरकारचे कौतुक केले.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज