Pune : कुख्यात गुंड गजा मारणे, पार्थ पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात

Pune : कुख्यात गुंड गजा मारणे, पार्थ पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात

Pune News : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत  (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची आज पुण्यात भेट झाली. लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाच दोघांची भेट झाली. आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगानेच ही भेट झाल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहेत. त्या देखील यावेळी उपस्थित होत्या.

पुण्यातील गुन्हेगारी जगतात मोहोळ आणि मारणे टोळ्यांचा मोठा दबदबा राहिला आहे. गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला होता. यानंतर तो पुण्यातील शास्त्रीनगर येथे राहण्यासाठी आला. मात्र येथूनच त्याचा गुन्हेगारी विश्वातील प्रवास सुरू झाला. सध्या पुण्यात ज्या टोळ्यांची दहशत आहे त्यात मारणे टोळीचं नाव आघाडीवर आहे. घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यातील वर्चस्वाचा वादही सर्वश्रुत आहे. याआधी खून प्रकरणात गजा मारणेला अटकही झाली होती. या खून प्रकरणात मारणे तीन वर्षे येरवडा कारागृहात बंद होता.

बिहारपाठोपाठ आंध्र-प्रदेशचाही मोठा निर्णय : लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘मास्टर स्ट्रोक’

गजा मारणेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजवणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील एका मोठ्या व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला मागील वर्षी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तेव्हापासून गजा मारणे बाहेर आहे. गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून या टोळीवर आतापर्यंत 23 हून आधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवरही सहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गजा मारणे ज्यावेळी तळोजा कारागृहातून बाहेर पडला त्यावेळी 300 चारचाकी वाहनांची मोठी रॅली काढण्यात आली होती. तेव्हा या रॅलीची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ (Sharad Mohol) याची कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने पुणे शहर हादरले होते. शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने या हत्येचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले होते.

Loksabha Election 2024 : भाजपचा बंपर विजय मात्र CM Shinde अन् Ajit Pawar ना धोक्याची घंटा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज