खळबळजनक! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या बॅनरवर ‘देशभक्त’ असा उल्लेख

  • Written By: Published:
खळबळजनक! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या बॅनरवर ‘देशभक्त’ असा उल्लेख

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची अलीकडेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, आता धनकवडी परिसरता मोहोळला श्रध्दांजली वाहणारे बॅनर (Sharad Mohol Banners) लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या श्रद्धांजलीसाठी लावलेल्या बॅनरवर मोहोळचा ‘देशभक्त’ असा उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापुरातील एका कार्यक्रमात भाजप नेत्यांनी मोहोळ हा हिंदुत्वासाठी काम करायचा असा दावा केला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून या बॅनरकडे पाहिलं जातं.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई ठरलं देशातील तिसरे स्वच्छ शहर 

सोलापुरातील जनआक्रोश मोर्चात बोलतांना भाजप आमदार टी राजा यांनी शरद मोहोळ हा देशभक्त होता. त्याने एरवडा कारागृहात एका दहशतवाद्याला ठार मारले होते, असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता यानंतर आता शहरातील धनकवडी परिसरात शरद मोहोळ यांच्या समर्थकांकडून श्रद्धांजलीचे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे शरद मोहोळचा देशभक्त असा उल्लेख आहे. हे बॅनर अजूनही त्याच ठिकाणी असल्याने पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नितेश राणेंककडून हिंदुत्ववादी उल्लेख
शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ भाजपच्या सदस्या आहेत. त्या पुणे शहर महिला आघाडीच्य सरचिटणीत आहेत. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपता प्रवेश केला होता. दरम्यान, नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुतारदारदा येथील मोहोळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद मोहोळचा हिंदुत्ववादी असा उल्लेख करत त्यांनं हिंदुत्वासाठी काम केल्याचे राणे म्हणाले. शरद मोहोळची प्रतिमा मलिन चुकीची दाखवली जाते,असंही ते म्हणाले.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई ठरलं देशातील तिसरे स्वच्छ शहर 

म्हणून माझ्या पतीची हत्या

दरम्यान, स्वाती मोहोळ यांनीही आपल्या पतीची हिंदुत्वासाठी काम करत असल्याने त्यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. स्वाती मोहोळ यांनीही माझा नवरा वाघ होता, तर मी त्यांची वाघीण आहे, असं म्हणत पतीच्या हत्येमुळं आपण खचून जाऊ, असं कोणीही समजू नये. जो पर्यंत मरण येत नाही, तोपर्यंत हिंदुत्वासाठी लढेनं.

आणखी दोघांना अटक

साहिल उर्फ ​​मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गडले, अमित मारुती कानगुडे, नामदेव महिपत कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके , विनायक संतोष घवाळकर, रवींद्र वसंतराव पवार आणि संजय रामभाऊ उडाण अशी आरोपींची नावे असून मोहोळच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. धनंजय मारुती व्हटकर (वय 25, रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय 28, रा. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube