दुतोंडी! एकीकडे भाजपवर टीका करायची अन् दुसरीकडे भाजपशी जवळीक…; शिंदे गटाचा दावा

  • Written By: Published:
दुतोंडी! एकीकडे भाजपवर टीका करायची अन् दुसरीकडे भाजपशी जवळीक…; शिंदे गटाचा दावा

Naresh Mhaske : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना नार्वेकरांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाने सडकून टीका केली. हा निकाल म्हणजे भाजपचीच स्क्रिप्ट असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, या आरोपांवर आता शिंदे गटाचे प्रवक्त नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिलं. कालचा निकाल हा भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप ते करतात. मात्र, त्यांचेच आदित्य ठाकरे भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी वेळ मागतायेत, असा दावा म्हस्के यांनी केला.

Pune : फडणवीसांकडून आमदार शिरोळेंवर मोठी जबाबदारी; निवडणुकांच्या तोंडावर PMRDA वर नियुक्ती 

नरेश म्हस्के यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. ठाकरे गटाकडून होत असलेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, शिल्लक सेनेचे नेते सरबरीत झाले आहेत. त्यांच्याकडून काहीही आरोप होत आहेत. कालच्या निर्णयानंतर शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याची, संपण्याची सुपारी भाजपने घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्या स्क्रिप्टनुसार हा निकाल दिल्लीतून आला आहे. पण हा निराधार आरोप आहे. मला खात्री आहे. नववर्षाच्या शुभेच्छानिमित्त आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्याची वेळ मागितली आहे. एकीकडे हे भाजपवर टीका करतात आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपाला वेळ मागतात. हे दुतोंडी सापासारखं वागणं आहे. एकीकडे महाविकास आघाडीला झुलवत ठेवण्याचा आणि दुसरीकडे भाजप नेत्यांशी युती करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे, असा आरोपही म्हस्के यांनी केला.

Pune News : 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा; मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला प्लॅन 

आमदार अपात्रता प्रकरणी निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या निर्णयाचे स्वागत करतांना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. हा घराणेशाही आणि हुकूमशाहीचा पराभव असल्याचं ते म्हणाले. यावरून संजय राऊतांना एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? असा सवाल राऊतांनी केली. त्यालाही नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं.

म्हस्के म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे हे स्वकर्तृत्वावार आणि मेहनत घेऊन आपल्या लोकसभा मतदारसंघात कामं करत आहेत. त्यांनी अनेक कामे मतदारसंघात केली आहेत. खासदार कसा असावा? याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे, खासदार श्रीकांत शिंदे. त्यांना अलीकडचे संसदरत्न पुरस्कारही मिळाला आहे. संजय राऊत यांच्याकडे कोणतेहगी मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळं ते या स्तरावर उतरले आहेत, असं म्हस्के म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube