Pune : फडणवीसांकडून आमदार शिरोळेंवर मोठी जबाबदारी; निवडणुकांच्या तोंडावर PMRDA वर नियुक्ती
पुणे : राज्य शासनाने पुणे महानगर नियोजन समिती (Pune Metropolitan Region Development Authority) सदस्यपदी शिवाजीनगरचे भाजप (BJP) आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांची नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. (BJP MLA Siddharth Shirole appointed as member of Pune Metropolitan Region Development Authority)
महाराष्ट्र शासनाने 2021 साली पुणे महानगर नियोजन समिती स्थापन केली. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील नागरी पायाभूत सुविधा, नागरी वाहतूक, पर्यावरण, उद्योग याचे नियोजन व्हावे आणि त्याआधारे विकास व्हावा याकरिता समिती स्थापन केलेली आहे.
Pune News : 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा; मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला प्लॅन
यामध्ये दोन तृतीयांश सदस्य हे निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाचे आहेत. तर एक तृतीयांश सदस्य हे आमदार, खासदार यांच्यासह राज्य आण केंद्र सरकारच्या प्रतिनिधींमधून केली जाते. याच पदावर आता आमदार शिरोळे यांचीही नियुक्ती केली आहे.
कराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक
‘नगरसेवक, पीएमपीएलचे संचालक आणि शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अशा कामांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अनुभव आहे. शहराचा विकास होत असताना शहराभोवतीच्या परिसराचाही विकास होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन’, अशी प्रतिक्रिया आमदार शिरोळे यांनी या नियुक्तीनंतर दिली आहे.