कराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक

कराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक

कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येसाठी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. धनंजय मारुती वटकर (वय २५, रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार साहिल पोळेकर आणि साथीदारांना पिस्तुले कोणी पुरवली, याचा पोलीस शोध घेत होते. (Crime Branch arrested two persons who supplied pistols in gangster Sharad Mohol murder case)

याबाबत तपासात मिळालेली अधिक माहिती अशी की, हत्येपूर्वी मुन्ना पोळेकर आणि अन्य आरोपींना पिस्तुले कोणी पुरवली, याचा पोलीस शोध घेत होते. या दरम्यान, वटकर आणि शेडगे यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांना गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. तसेच पिस्तूल मिळाल्यानंतर पोळेकर आणि अन्य आरोपींनी मुळशी तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला होता. अशीही माहिती समोर आली. आता पोलीस या जागेचा शोध घेत आहेत.

अजूनही काही संशयित पोलिसांच्या रडारवर :

आरोपींना हत्येच्या दरम्यान एकाने सीमकार्ड दिले. याच सीमकार्डद्वारे आरोपींनी काहीजणांशी संपर्क साधला.आरोपींना हे सीमकार्ड नेमके कोणी दिले आणि त्यांनी नेमका कोणाशी संपर्क केला या सर्वांचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. याशिवाय खून करून आरोपी रिक्षातून पसार झाले होते. ही एकप्रकारे आरोपींना पळून जाण्यासाठी मदतच होती, असा दावा केल्याने तो रिक्षा चालकही आता पोलिसांच्या रडारवर आला आहे.

भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर

या खून प्रकरणात आतापर्यंत साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार आणि अॅड. संजय उडान यांना अटक करण्यात आली आहे. अॅड. पवार आणि अॅड. उडान यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले.

Rohit Pawar: ‘वयावरुन टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित दादांना रोहित पवारांनी सुनावलं

तर पोळेकर, कानगुडे, शेळके, गव्हाणकर, गांदले यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी बँक  व्यवहार नोंदी तपासणी, सीसीटीव्ही चित्रीकरण अशा इतर तांत्रिक बाबींचा तपास होणे बाकी असल्याने न्यायालयाने आरोपींना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube