MP Loksabha Election : पक्की घरं, स्वस्त सिलेंडर अन् खात्यांत जमा होणार पैसे; मध्यप्रदेशच्या जनतेला भाजपची आश्वासन

MP Loksabha Election : पक्की घरं, स्वस्त सिलेंडर अन् खात्यांत जमा होणार पैसे; मध्यप्रदेशच्या जनतेला भाजपची आश्वासन

MP Loksabha Election : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं (MP Loksabha Election) रिंगण तापलेलं आहे. त्यात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने जोरात प्रचारकार्य करत आहे. त्यात आता सध्या सत्तेत असलेल्या भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपला जाहिरनामा जाहिर केला आहे. ज्यामध्ये विविध अश्वासनं देण्यात आले आहेत.

Indian Railway : रेल्वे पकडताना चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू; अनेक बेशुद्ध

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून हा जाहिरनामा जाहिर करण्यात आला आहे. ज्याच नावं ‘मध्यप्रदेश संकल्प पत्र 2023’ असं आहे. यावेळी नड्डा म्हणाले की, दिवसेंदिवसं निवडणुकांमध्ये जाहिरनाम्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. कारण राजकीय पक्ष पहिले मतदारांना आकर्षित करतात नंतर त्यांना फसवलं जातं. मात्र भाजपने दिलेली अश्वासनं पाळले आहेत.

Parineeti Chopra: राघव चड्ढाच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीची खास पोस्ट; म्हणाली, देवाने मला…’

तर हा जाहिरनामा वाचून दाखवताना नड्डा म्हणाले की, यावेळी जाहिरनाम्यामध्ये 1 कोटी 30 लाख महिलांना आर्थिक मदत तसेच पक्कं घरं देखील दिलं जाणार आहे. ग्रामीन महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचं काम सुरू करण्यात येणार आहे. भाजपचा हा जाहिरनामा त्यांच्या एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 20 अश्वासन देण्यात आले आहेत.

भाजपने दिले मतदारांना अश्वासनं…

– गरिबांना 5 वर्ष मोफत रेशन मिळणार
– शेतकऱ्यांकडून 2700 रूपये प्रति क्विंटल गहू आणि 3100 रूपये प्रति क्विंटल धान्य खरेदी केलं जाणार
– शेतकरी सन्मान निधी आणि शतकरी कल्याण योजनेतून वर्षाला 12000 रूपये दिले जाणार
– पंतप्रधानसह मुख्यमंत्री घरकुल योजना सुरू केली जाणार
– 1 कोटी 30 लाख महिलांना आर्थिक मदत तसेच पक्कं घरं
– प्रत्येक कुटुंबात एक रोजगार किंवा स्वंयरोजगार मिळणार
– ग्रामीन महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचं काम सुरू करण्यात येणार
– मुलीच्या जन्मानंतर 21 वर्षांपर्यंत 2 लाख रूपये मिळणार
– गरिब मुलांना मोफत शिक्षण
– उज्वला योजनेत मिळणार 450 रूपायात सिलेंडर मिळणार. या सारखे विविध अश्वासन भाजपच्या या जाहिरनाम्यात देण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube