Indian Railway : रेल्वे पकडताना चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू; अनेक बेशुद्ध
Indian Railway : गुजरात राज्यातील सूरत रेल्वे स्टेशनवर (Indian Railway) प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीमुळे येथे पळापळ होऊन चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दिवाळी आणि छठ उत्सवासाठी घरी जाण्यासाठी गर्दी झाली आहे. शनिवारी रेल्वे पकडण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान बिहारला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी अचानक पळापळ सुरू झाली. याच पळापळीत एक व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडला नंतर त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या पळापळीत अनेक लोक खाली पडले. त्यातील काही जण जखमीही झाले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती छपरा येथील रहिवासी होता. वीरेंद्र कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. वीरेंद्र सूरतमध्ये नोकरी करत होता. छठ उत्सवासाठी तो आपल्या भावाबरोबर गावी निघाला होता. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी आणखीही काही प्रवासी बेशुद्ध झाले होते. मात्र त्यांना शुद्धीवर आणण्यात यश आले.
सूरत-गुवाहटी ट्रॅव्हलिंग म्हणजे संघर्षयात्रा नाही, अनेकांना CM..; ठाकरेंची शिंदे-दादांवर टोलेबाजी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताप्ती गंगा एक्सप्रेस रेल्वे ज्यावेळी स्टेशनमध्ये आली त्यावेळी रेल्वे पकडण्यासाठी प्रवासी जोरात पळू लागले. अचानक पळापळ सुरू झाली आणि तीन ते चार जण बेशुद्ध झाले. वीरेंद्र कुमारही बेशुद्ध झाले. बेशुद्ध पडलेल्या सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी वीरेंद्रकुमार यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवाल त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की बिहारकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी अचानक पळापळ सुरू झाली. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. यानंतर आपण स्वतः रेल्वे स्टेशनचा दौरा करणार आहोत. सध्या दिवाळी आणि छठपूजा सणासाठी घरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढली आहे. सगळ्या रेल्वे फूल झाल्या आहेत. वेटिंग लिस्ट 300 च्या पुढे गेली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता आणखी जादा रेल्वेंची व्यवस्था करण्यासाठी नियोजन केले जात आहे.
गुजरात हादरलं : फर्निचर व्यापाऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवलं; एकाच घरात आढळले सात मृतदेह