गुजरात हादरलं : फर्निचर व्यापाऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवलं; एकाच घरात आढळले सात मृतदेह

गुजरात हादरलं : फर्निचर व्यापाऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवलं; एकाच घरात आढळले सात मृतदेह

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये (Surat) एकाच घरात सात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावी, अशी शंक्यता व्यक्त केली जात आहे. फर्निचर व्यावसायिक शांतिलाल सोलंकी, त्यांचे वडील कनुभाई सोलंकी, आई शिलाबेन सोलंकी, पत्नी रीटा सोलंकी आणि मुली काव्या सोलंकी, दीक्षा सोलंकी तर मुलगा कुशल सोलंकी अशी मृतांची नावे आहेत. यातील शांतिलाल यांचा मृतदेह फासाला लटकलेला तर अन्य सहा जणांचा मृत्यू विषामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. (Mass suicide of seven people in one house in Surat, Gujarat)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी (28 ऑक्टोबर) सुरतमधील अडाजन भागातील सिद्धेश्वर अपार्टमेंटमधून ही घटना उघडकीस आली आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर अडाजन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यात शांतिलाल सोलंकी यांचा मृतदेह खोलीत पंख्याला फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर अन्य सहा जणांचा विषामुळे मृत्यू झाला आहे.

Madhya Pradesh : नोकरी गेली अन् तिकीटही नाही! चौहान सरकारने केला उपजिल्हाधिकाऱ्याचा गेम

प्रथमदर्शनी, शांतिलाल यांनी पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांना विष दिले असावे आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, याबाबत अधिक तपास सुरु आहे. मृत्यूचे स्पष्ट कारण आणि वेळ जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठिवले आहेत. सोबतच कुटुंब आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पोलिसांनी शेजारी आणि परिसरातील इतर लोकांची चौकशी सुरू केली आहे. या सामूहिक आत्महत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी आर्थिक समस्या, कौटुंबिक वाद यासह सर्व बाबींचा तपास करत आहेत.

सुसाईड नोटही समोर :

दरम्यान, या घरातून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. नोटमध्ये शांतिलाल सोलंकी यांनी आर्थिक समस्यांचा उल्लेख केला आहे. आर्थिक अडचणींमुळे संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे. शांतिलाल सोलंकी यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी फोन करूनही शांतिलाल यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कर्मचारी घरी गेले, पण दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube