SHE Marts : बजेटमध्ये घोषित झालेलं SHE Marts मिशन काय? काय विकता येणार, अर्ज कसा करायचा?
She Marts Mission Scheme महिलांना केवळ उत्पादनच नाही तर, मोठ्या प्रमाणावर त्यांच्या वस्तू विकता याव्यात अशी सरकारची इच्छा आहे.
What Is She Marts Mission Scheme How To Apply : नुकत्याच जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारतर्फे महिलांसाठी SHE Marts Mission नावाची नवीन आणि अनोखी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण महिलांना केवळ कर्जदार म्हणून नव्हे तर, त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाच्या मालक म्हणून सक्षम करणे असल्याचे केंद्राने स्पष्ट केलयं. या योजनेत महिलांना नेमकं काय विकता येणार आणि यासाठी अर्ज नेमका कसा करायचा.
डिलिव्हरी बॉयची कमाई ऑफीसच्या नोकरीपेक्षा जास्त?, Zomato चे सीईओ काय म्हणाले?
योजनेचा अर्थ काय?
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या She Mart या योजनेत SHE चा अर्थ सेल्फ हेल्प एंटरप्रिनर असा आहे. या योजनेअंतर्गत, देशातील प्रत्येक जिल्ह्यात SHE मार्ट उघडले जाणार असून, याअंतर्गत सुरू करण्यात आलेली दुकाने महिला स्वतः चालवतील आणि ग्रामीण महिला आणि स्वयं-मदत गटांनी (SHGs) बनवलेल्या उत्पादनांची विक्री करतील.
She मार्ट्स मिशन का सुरू करण्यात आले?
आतापर्यंत अनेक महिला छोट्या प्रमाणावर काम करत होत्या, पण त्यांना शाश्वत बाजारपेठांचा अभाव होता. महिलांना केवळ उत्पादनच नाही तर, मोठ्या प्रमाणावर त्यांच्या वस्तू विकता याव्यात अशी सरकारची इच्छा आहे. ही योजना लखपती दीदी योजनेच्या यशावर आधारित आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता दर 6 तासांनी ऑटो-लॉग आउट होणार व्हॉट्सअॅप; नवा नियम काय?
She Mart मध्ये कोणती उत्पादने विकता येणार?
SHE Marts ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंची विक्री करता येणार
ज्यात, हस्तनिर्मित आणि हस्तकला उत्पादने
लोणचे, पापड, मसाल्यांसह इतर अन्न उत्पादने
कपडे, शिवणकाम आणि भरतकाम
बांबू, माती आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू
स्थानिक आणि पारंपारिक उत्पादने
कोणत्या महिलांना करता येणार अर्ज?
SHE मार्ट सामान्यतः क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) द्वारे चालवले जाणार असून, ही योजना विशेषतः ग्रामीण महिलांसाठी असून, ज्या महिला NRLM अंतर्गत नोंदणीकृत SHG चे सदस्य तसेच लखपती दीदी योजनेशी संबंधित असणाऱ्या महिलांना यात प्राधान्य दिले जाणार याशिवाय उत्पादन, हस्तकला किंवा अन्न प्रक्रियेत सहभागी महिलांनादेखील या योजनेत सहभागी होता येणार आहे.
मोठी भविष्यवाणी! ‘‘AI युगात गरिबी संपेल, पैशांची गरज राहणार नाही; नोकरी फक्त छंद राहिल”
अर्ज कसा करायचा?
या योजनेतील अर्ज स्वयंसेवा गट नेटवर्कद्वारे स्वीकारले जणार
यासाठी सर्वप्रथम महिलांना सक्रिय स्वयंसेवा गटात सामील व्हावे लागेल
बचत गट सीएलएफ द्वारे प्रस्ताव सादर करेल
त्यानंतर उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्रीयोग्यता तपासली जाणार
निवडीनंतर प्रशिक्षण दिले जाईल (डिजिटल पेमेंट, स्टॉक व्यवस्थापन इ.)
यानंतर, आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाईल
ही योजना नवीन असल्याने, महिलांनी DRDA आणि SRLM शी संबंधित अपडेट्सवर लक्ष ठेवावे.
