Sanjay Raut : ‘शिखर बॅंक घोटाळ्यातला क्लोजर रिपोर्ट हा सर्वात मोठा भ्रष्टाचार’
शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्ट हा देशातली सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. दरम्यान, शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून त्यामध्ये कुठेही आरोप सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरुन संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. जनतेचा पैसा लुटणाऱ्या सोडणार नाही त्यांना तुरुंगात टाकणार असल्याचं म्हटलं होतं. शिखर बँक, सिंचन बँक घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चव्हाट्यावर आणला होता. यावर भाजप तसेच नरेंद्र मोदी यांनी भाष्य करावे आणि अशा प्रकारचा क्लोजर रिपोर्ट विशेषत: भाजपच्या वॉशिंग मशीन गेल्यावरच का क्लोज होतात? असा सवाल संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींना केला आहे.
सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल
तसेच भाजप आणि सत्ताधाऱ्यांकडेच अशा प्रकारचा क्लोजर रिपोर्ट आहे, शिखर बॅंक घोटाळा प्रकरणातला पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून ही फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळ्याचा आरोप असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ईडीकडून चौकशी सुरुच राहणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांना ईडी चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींना दिलासा मिळाला आहे.
शिखर बॅंक घोटाळा प्रकरणातील आरोपींना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई पोलिसांकडून दुसऱ्यांदा न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांवर करण्यात आलेले आरोप सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना या प्रकरणात मोठा दिलासाच मिळाला आहे. शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीकडूनही समांतर तपास सुरुच राहणार आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचीही चौकशी झाली आहे. यांच्यासह अजित पवार आणि इतर अन्य नेत्यांची चौकशी झाली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही केस पुन्हा उघडून तपास सुरु असल्याचं अर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सांगण्यात आलं होतं. त्यानूसार आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर लवकरच निर्णय होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.