Pune Accident : “ब्लड रिपोर्टची गरज नाही, आमच्याकडे त्याहून मोठा पुरावा”: अमितेश कुमार

Pune Accident : “ब्लड रिपोर्टची गरज नाही, आमच्याकडे त्याहून मोठा पुरावा”: अमितेश कुमार

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. त्याच्या वडिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे पोलीस वेगाने तपास करत आहेत. आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्वाचे खुलासे केले. अल्पवयीन आरोपीला जाणीव होती, की दारू पिऊन गाडी चालवली तर कुणाचाही जीव जाऊ शकतो. तसेच आम्हाला ब्लड रिपोर्टची गरज नाही. तो दारू पित होता याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे. तसेच त्याने मद्यप्राशन केलं होतं ही गोष्टी सुरुवातीला मान्य करण्यात आली नाही. यावर उत्तर देताना अमितेश कुमार म्हणाले, ब्लड रिपोर्ट आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. कारण त्यावेळी अल्पवयीन आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता. त्याला चांगलं माहिती होतं की दारू पिऊन गाडी चालवली तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.

Pune Accident : अजितदादा पुण्याचे की बिल्डरचे पालकमंत्री? दादा गप्प का? राऊतांचे टोचणारे सवाल

ड्रायव्हर कार चालवत होता का याचा तपास करणार

अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांनी पोलीस चौकशीत असा दावा केला आहे गाडी त्यांचा ड्रायव्हर चालवत होता. यावर अमितेश कुमार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अपघात घडला त्यावेळी गाडीत चार लोक होते. ड्रायव्हरवर कार चालवत असल्याचे सांगण्याचा दबाव होता. काही घटनाक्रम बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. कारचालकाने गाडी मी चालवत होतो असे सुरुवातीला सांगितले होते. यात कुणाचा दबाव होता का याचा तपास केला जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा पार्टी झाली होती असे अजून तरी समोर आलेले नाही. मात्र सुरुवातीच्या काळात येरवडा पोलिसांकडून दिरंगाई झाली हे खरं आहे. यात आता पुढील तपास करून त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे अमितेश कुमार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पहिला रक्त नमुना सकाळी आठ वाजता गुन्हा दाखल झाल्यावर ११ वाजाता करण्यात आला तर दुसरा ब्लड नमुना सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान घेण्यात आला. पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्न कुणी केला असेल तर त्यांच्यावर कलम 201 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पुणे कार अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्या; पटोलेंची मागणी

आरोपी दारू पित होता याचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज

आधी आम्ही 304 अ कलम लावलं होतं. यामध्ये एक व्यक्ती दारुच्या नशेत, शुद्ध नसताना अपघात झाला तर हे कलम जामीनपात्र आहे. यात तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आता आम्ही 304 कलम लावलं आहे. म्हणजे त्याला या गोष्टीची जाणीव होती की त्याच्या कृत्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. अल्पवयीन असतानाही महागडी गाडी चालवणे, पबमध्ये जाऊन दारू पिणे, नंतर एका मोठ्या रस्त्यावर रहदारी होते तिथे वेगात गाडी चालवणे त्याला जाणीव होती की त्याच्या कृत्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तो दारू पित होता याचं सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडं आहे त्यामुळे ब्लड रिपोर्टची गरज नाही, असे अमितेश कुमार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज