‘पब’वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

‘पब’वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

Pune Kalyaninagar accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात नुकताच भीषण अपघात झाला आहे. पोर्शे कारने बाईकला धडक दिली. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अल्पवयीन तरुण पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करताना दिरंगाई केल्याचा आरोप आहे.

 

 मुलामुळे माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली  पुणे अपघातानंतर आमदार पत्नीने सांगितली कटू आठवण

ट्विटर अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर

सध्या पुण्यातील हे अपघाताचे प्रकरण चांगलंच गाजलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याच्या रक्ताचा अहवाल कळीचा मुद्दा ठरला. वेदांतने मद्यप्राशन केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. डॉ. मीरा या ट्विटर अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

 

डॉक्टरची चौकशी करा

या ट्विटमध्ये ब्लड रिपोर्टविषयी काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. पबवाल्यांवर कारवाई करणं फारसं महत्त्वाचं नाही. त्याऐवजी वेदांत अग्रवालची तपासणी करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करा. तसंच, ब्लड रिपोर्टचा लिफाफा ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हातात देण्यात आला, त्याचीही चौकशी करा. यामधून ब्लड रिपोर्टचे सत्य समोर येईल, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

Pune Accident: पुणे अपघातप्रकरणी संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि…

तरच त्याचं नाव लिहिलं जातं

सरकारी रुग्णालयात (Alcohol test) अल्कोहोल चाचणीसाठी आरोपी आमच्याकडे आणले जातात तेव्हा पोलीस एक (memo) घेऊन येतात. आरोपी (minor) अल्पवयीन असेल तर त्यावर विधिसंघर्षग्रस्त बालक असं लिहितात, आणि (adult) प्रौढ असेल तरच त्याचं नाव लिहितात. त्यानंतर डॉक्टर त्याची (Basic Clinical) प्राथमिक तपासणी करतात, (vitals) मार्क लिहितात.

 

चाचणी कोणत्या रुग्णालयात झाली

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेदांतचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती मंगळवारी दिली होती. त्यामुळे ब्लड रिपोर्टविषयीचे गूढ कायम आहे. या सगळ्यावरही या पोस्टमधून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वेदांतने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची चाचणी कोणत्या रुग्णालयात किंवा फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली? ही चाचणी कोणत्या डॉक्टरने केली? फॉर्ममध्ये मद्यप्राशानाविषयी काय निष्कर्ष नोंदवले होते आणि काय शेरा दिला होता?, याविषयीही पोस्टमधून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज