आंध्र प्रदेशात भीषण अपघात! हायवेवर बस-ट्रक धडकेत सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशात भीषण अपघात! हायवेवर बस-ट्रक धडकेत सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Road Accident : आंध्र प्रदेशातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील (Road Accident) बापटला जिल्ह्यात हैदराबाद विजयवाडा महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला. बापटला येथून हैदराबादकडे जाणाऱ्या बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. यानंतर बसने पेट घेतला. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

आता या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बस पेट घेताना दिसत आहे. टक्कर झाल्यानंतर बस आणि ट्रकनेही पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की दोन्ही वाहने जळून खाक झाली. एका अन्य व्हिडिओत अग्निशमन विभागाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवताना दिसत आहेत. बापटला येथून मतदान करून लोक पुन्हा माघारी निघाले होते असे सांगण्यात येत आहे.

Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू

एक खासगी बस बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादकडे निघाली होती. त्याचवेळी विजयवाडा महामार्गावर चिलकलुरिपेट जवळ बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या बसमध्ये ४२ प्रवासी होते. जीव वाचविण्यासाठी या लोकांनी पळापळ करत बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, यात ट्रक, बसचालक आणि चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. तसेच ट्रक ड्रायव्हर आणि बस ड्रायव्हरचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक बापटला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जखमी झालेल्या लोकांना चिलकलुरिपेट शहरातील सरकारी दवाखान्यात दाख करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना गुंटूर येथे नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.

मोठी बातमी : द.आफ्रिकेत मोठा अपघात; प्रवाशांना घेऊन जाणारे बोइंग 737 विमान धावपट्टीवर कोसळले

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube