Bus Accident : बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू

Bus Accident : बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू

Satara Accident News : राज्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल बुलढाण्यात मलकापूरजवळ दोन खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका दुर्घटनेची बातमी येऊन धडकली आहे. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Buldhana Accident : भीषण अपघात! बुलढाण्यात दोन बस समोरासमोर धडकल्या, 5 जणांचा जागीच मृत्यू

याबाबत आधिक माहिती अशी, बस पसरणी घाटातील अवघड वळणावर होती. येथेच बसचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे ही बस घाटात मागच्या दिशेने गेली. मागील बाजूस एक दुचाकीस्वार होता. बस सरळ त्या दुचाकीस्वारावर गेली. या दुचाकीवर एक महिलाही होती. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच बस नियंत्रित करण्याचे प्रयत्न चालकाने केले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. यानंतर बस घाटावरील कठड्यात अडकली. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना मात्र टळली. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पूर आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. डोंंगर कडेला असलेली गावे तसेच घाटातून जाणाऱ्या रस्त्यांवर दरडी कोसळत आहेत. तसेच या दिवसांत वाहनांचे ब्रेक फेल होण्याचीही शक्यता असते. सध्या या दिवसांत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube