live now
Ajit Pawar : पाया पडले, मिठी मारली, लाडक्या लेकांकडून लाडक्या बाबांना अखेरचा निरोप
Ajit Pawar यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Deputy CM Ajit Pawar Funeral Last Rites Live Updates : काल विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आज (दि.29) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यापूर्वी अजित पवार यांचा पार्थिव अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर गदिमा सभागृहापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंत्ययात्रेला सुरूवात झाली.
LIVE NEWS & UPDATES
-
अमित शाह यांनी अजितदादांना पु्ष्यचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
#WATCH बारामती: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार को अंतिम श्रद्धांजलि दी। pic.twitter.com/cygJJWiJ2V
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2026
-
पाया पडले, मिठी मारली, लाडक्या लेकांकडून लाडक्या बाबांना अखेरचा निरोप
#WATCH महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजीत पवार के बेटे, पार्थ और जय ने बारामती में अपने पिता की अंतिम संस्कार की रस्में निभाईं। pic.twitter.com/4Uq5Qey0yB
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2026
-
सुप्रिया सुळेंनी मध्यरात्री 1.44 ला पुन्हा ठेवलं व्हॉट्सअॅप स्टेटस...
अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून, पवार कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. दादांच्या निधनानंतर मध्यरात्री सुप्रिया सुळेंनी 1.44 ला पुन्हा ठेवलं व्हॉट्सअॅप स्टेटस होतं ज्यात त्यांनी विधानभवनातील सभागृहात लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर झळकणारा अजित पवार यांचा फोटो आणि त्यांच्याशी संबंधित माहिती असलेले दृश्य सुप्रिया सुळे यांनी आपल्या मोबाईल स्टेटसमध्ये शेअर केले आहे. या स्टेटसवर त्यांनी केवळ एकच शब्द लिहिला आहे. “Heartbreaking”. या शब्दांतून त्यांच्या मनातील भावनिक वेदना आणि आपुलकी स्पष्टपणे व्यक्त होते. तसेच त्यांनी ब्रोकन हार्ट इमोजी देखील आपल्या स्टेटसमध्ये ठेवले आहे.

-
मी अजित दादांना म्हणालो होतो गाडीने बारामतीला जाऊ पण त्यांनी…
अजित पवार यांचे चालक म्हणाले की, मी 1999 पासून अजित दादांचा चालक आहे. परवा रात्री दादांच्या मिटिंग लवकर झाल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की, आपण गाडीने बारामतीला जाऊयात… यावर दादांनी नकार दिला आणि मला म्हणाले मी जातो तू गाडीने ये पुण्याला… त्यांनी माझे ऐकले नाही. माझा देव गेला म्हणत त्यांचे चालक श्यामराव नारायण मनवे यांना टाहो फोडला.
-
आदल्या रात्रीच अजित दादा बोलून गेले अन् प्रफुल पटेलांनी सांगितलं शेवटचं संंभाषण
-
"नियतीचं बोलावणं आल्यावर जावं लागतं" ४ दिवसांपूर्वीच अजित पवार बोलले अन्...
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांची २४ जानेवारीला सभा पार पडली होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही-आम्ही आज असू, उद्या नसू. काळाच्या, नियतीच्या पुढे बोलावणे आले तर प्रत्येकाला जायचंय..परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना राजकारण हेच सर्वस्व नाही. राजकारण होत असते. निवडणुका संपल्यावर राजकारण विसरायचे असते. पण ज्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे हे पाहिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं होते.
-
प्रफुल्लजी, आता भेट होणार नाही; आदल्या रात्रीच अजित दादा बोलून गेले होते
मंगळवारी (दि.27) रात्री साडेआठच्या सुमारास अजितदादांचा मला फोन आला होता. आमचं बोलणं झालं. शेवटी ते एवढंच म्हणाले की, ‘प्रफुल्ल, आता भेट होणार नाही, कारण मी आठ-दहा दिवस बाहेर आहे.’ आज खरंच तसं घडेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
प्रफुल्लजी, आता भेट होणार नाही; आदल्या रात्रीच अजित दादा बोलून गेले होते
-
परत या परत या.. अजित दादा परत या… काटेवाडीत कार्यकर्त्यांचा आक्रोश…
अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतून बारामतीकडे रवाना झाले. यावेळी कार्यकर्ते भावूक होताना दिसत आहेत. रस्त्यांवर मोठी गर्दी लोकांनी केली आहे.
-
दु:खाचा डोंगर… जय पवार यांनी जोडले हात
वडील अजित पवार यांच्या निधनानंतर जय पवार आणि पार्थ पवार सतत पार्थिवाच्या जवळ दिसत आहेत. यादरम्यान काटेवाडीकडून बारामतीकडे अजित पवार यांची अंत्ययात्रा निघाली असता लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले आहेत. जय पवार हात सोडून उभा आहे.
-
पुतण्याचे पार्थिव येण्यापूर्वीच शरद पवार विद्या प्रतिष्ठानात, हात जोडत पवारांनी…
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीत दाखल होत आहे. अजित पवारांचे पार्थिव येण्यापूर्वी शरद पवार बऱ्याच वेळापासून विद्या प्रतिष्ठात बसून आहेत. यावेळी त्यांचा चेहरा बरेच काही सांगून जात आहे. अत्यंत वाईट काळ पवार कुटुंबियांसाठी आहे.
