Video : आजपर्यंत कपाळाला गुलाल लागला नाही! लोणीकंद-पेरणे गटाचे उमेदवार प्रदिप कंद काय म्हणाले?

पुण्यातील लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार प्रदिप वसंतराव कंद यांची सविस्तर मुलाखत

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 02 06T122422.496

स्व. अजितदादांच्या जाण्याने मी नव्हे महाराष्ट्रातील (Ajit Pawar) प्रत्येक कुटुंबाला वाटत आपल्या घरातील व्यक्ती गेला आहे. घरातील प्रमुख पुरूष गेल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. ज्यांच्या जिवावर आम्ही राजकारण करतो, लोकांना आश्वासन देतो हे सगळं आता कुणाकडं करायचं असं म्हणत, पुण्यातील लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार प्रदिप वसंतराव कंद यांनी आपल्या भावना आणि आता आपण काय करणार आहोत याविषयी सविस्तर भाष्य केलं आहे. ते लेट्सअप मराठीवर बोलत होते.

तुमचा पक्ष प्रवेश दादांनीच करून घेतला हे कसं घडलं यावर बोलताना कंद म्हणाले, निवडणुकीची चर्चा सुरू होती. त्याच काळात माझ्या भावाशी दादांनी चर्चा केली. त्यांनी थेट मला बोलवा आणि तिथ त्याला निवडणूक लढवायची असं सांगितलं. सध्या तुमच्या भागात वाहतूक हा मोठा प्रश्न आहे यावर बोलतना ते म्हणाले, माझ्या स्तरावर हा विषय येत नसला तरी मी त्याचा पाठपुरावा करणार आहे. अनेक दिवसांपासून तीन मजली रिंगरोडची चर्चा सुरू आहे, परंतु तसं काही होताना दिसत नाही असंही म्हणाले. परंतु, जे जे छोटे प्रश्न आहेत त्यामध्ये लक्ष घालणार आहेच असंही ते यावेळी म्हणाले.

पुणे झेडपी गटांचं आरक्षण जाहीर! ओबीसीसाठी १९ गट राखीव, वाचा संपूर्ण यादी

माझ्या गटात दोन नाव सादर्म्य असंल तरी ते आमच्या घरातीलच आहेत. परंतु, मागच्या काही काळात वैचारीक पातळीवर थोडा फरक राहीला. मधल्या काळात अनेक स्थित्यंतर आली, वादळ आली पण कधी तडजोड केली नाही असं म्हणत कंद यांनी आपल्या विचारांचा लेखाजोखा मांडला. आजपर्यंत कपाळी गुलाल लागलाच नाही, परंतु, मी लोकांच्या प्रत्येक सुख दु:खात सामिल होत गेलो. आज अशी परिस्थिती आहे की मी अपक्ष असलो तरी तुम्हाला निवडून देऊ असा विश्वास लोकांचा आहे असंही कंद यावेळी म्हणाले.

मला लोकांचा पाठिंबा आहे हेच लक्षात आल्यानंतर दादांनी संधी दिली. आज आव्हान आहे आणि ते कायम असतं त्यामुळं आम्हाला ते काही नवीन नाही. पण लोक पाहत असतात. आपल्याला यातील माहिती आहे का आणि आपण काम करण्यासरखे आहोत का हे लोक पाहतात असंही ते म्हणाले. तसंच, गेली अनेक वर्षात जेवण माझं नसलं तरी वाढपी मी राहिलेलो आहे, अडचणीच्या काळात जिल्हा परिषदेची काम मी आणलेली आहेत. तसंच, माझ्या जिल्हा परिषद गटातील कोणत्या व्यक्तीची कोणत्या डीपीवर लाईट आहे हेही मला माहिती आहे, त्यामुळे हा अनुभव असल्याने लोकांनी मला सहकार्य करावं असंही ते यावेळी म्हणाले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची संकल्पना दादांच्या समोर मांडली. काही दिवसांपूर्वी दादांनी त्याचं भूमिपुजन केलं. या स्मारकामुळं रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. हे स्मारक फक्त स्मारकं नाही, देशभरातील सर्वात मोठ स्मारक होत आहे. अनेक लोकांना आवर्जून तिथ यावं वाटेल असं हे स्मारक आहे असंही ते म्हणाले, फक्त वाईट याचं वाटत की हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर दादा नसतील. या कामातील प्रत्येक विट सांगेल दादांच काय काम आहे. आमचा पूर्ण भाग दादांमुंळे अर्थिक उलाढालीचा भाग झाला आहे.

पीएमआरडीचे काही काम यावेत यासाठी तुम्ही काही करणार आहात का? यावर बोलताना कंद म्हणाले, आता सर्व परवानग्या पीएमआरडीकडं गेल्या आहेत. ग्रामपंचायत सक्षम असली तरी सरपंच मर्यादीत असतो. सरपंच आणि आमदार यांच्यामधला दुवा जिल्हा परिषद सदस्य आहे. आज 12 गावं असे आहेत जीथ पीएआरडीचा निधीच आला नाही. त्यामुळे हा महत्वाचा विषय आहे. आता संधी मिळाली तर हा निधी खूप आहे. मी तो निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असंही कंद यावेळी म्हणाले.

Tags

follow us