सर्वसामान्यांना झटका! ‘रेपो रेट जैसे थे’च ठेवण्याची घोषणा; EMI कमी होण्यासाठी बघावी लागणार वाट
Repo Rate हा असा व्याजदर असतो, ज्यावर RBI देशातील बँकांना कर्ज देते. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँकांना कमी दरात निधी उपलब्ध होतो.
RBI Repo Rate Update : रिझर्व्ह बँकेने पतधोरण बैठकीनंतर रेपो रेट जैसे थे ठेवण्याची घोषणा केली असून, हा दर 5.25 इतकाच ठेवला जाणार आहे. यापूर्वी, आरबीआयने गेल्या वर्षभरात 1.25 बेसिस पॉइंट्सने रेपो दरात कपात केली होती. मात्र, यंदाच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता जरी वाढणार नसला तरी, तो कमी होण्याची वाट बघणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
IAS-IPS उमेदवारांसाठी काय बदललं?, UPSC परीक्षेचे नवे नियम काय?, वाचा महत्वाचे मुद्दे
भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम
जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम राहिली आहे. येत्या काळातही तेजी कायम राहणार असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहित महागाईचा दर 3.9 टक्क्यांवरुन 4 टक्के होण्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. तर, FY 26 मध्ये जीडीपीचा अंदाज 7.3 टक्क्यांवरुन वाढवून 7.4 टक्के करण्यात आलाय. याशिवाय ईयू आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलमुळे निर्यातीला चालना मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी मल्होत्रा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
The Monetary Policy Committee has decided to keep the policy repo rate unchanged at 5.25%, and to maintain a neutral stance, says RBI Governor Sanjay Malhotra. pic.twitter.com/KhaWPXnhXx
— ANI (@ANI) February 6, 2026
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा असा व्याजदर असतो, ज्यावर रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज देते. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँकांना कमी दरात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे त्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी करतात. परिणामी, गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्तेही कमी होतात. म्हणूनच रेपो रेटमध्ये होणारे बदल सर्वसामान्य ग्राहकांच्या EMI वर थेट परिणाम घडवतात.
जगात काँग्रेसची मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यातच माझा मौल्यवान वेळ खर्ची; राज्यसभेत मोदींनी काढले वाभाडे
मध्यमवर्गीयांच्या खिशावर कसा परिणाम होतो?
जर आरबीआयने रेपो दर वाढवला तर बँकांना जास्त व्याजदराने कर्ज मिळेल. त्यानंतर बँका जास्त व्याजदर आणि ईएमआयवर कर्ज देतात. रेपो दरातील कपात मध्यमवर्गाच्या खिशावर कसा परिणाम करू शकते हे समजून घेऊया. तुम्ही बँकेकडून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 8.70 टक्के व्याजदराने 30 वर्षांसाठी घेतले असेल, तर तुमचा सध्याचा ईएमआय 39,157 रुपये असू शकतो. मात्र जर रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी केला तर व्याजदर 8.45 टक्के होईल. त्यानंतर ईएमआय 38,269 रुपये होईल.
