पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

Rohit Pawar Ajit Pawar

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही चलबिचल सुरू झाली आहे. पटेल यांच्या या वक्तव्यावर आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’

पवार म्हणाले, मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. परंतु, सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीत असते तर पुढील पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहिले असते. पण, सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भांडणे लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 अजितदादा 5-10 वर्षांनंतर मुख्यमंत्री होतील ?

याआधी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली होती. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल, अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील. भविष्यात अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. भविष्यात म्हणजे 5 ते 10 वर्षांनंतरही अजित पवार मुख्यमंत्री होतील. ते आता कसे सांगता येईल, असे शिरसाट म्हणाले होते.

सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, आमदार तनपुरेंची खोचक टीका…

पटेल काय म्हणाले?

आज जर मुख्यमंत्रिपदाची जागा खाली नसेल तर त्याबद्दल चर्चा कशाला करता. आज अजितदादा महाराष्ट्राचे नक्कीच वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहेत. असं आहे की, कधी न कधी आज जरी नाही तर उद्या नक्कीच त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, असं असलं तरी आज ती जागा रिकामी नाही तर मग त्यावर चर्चा कशासाठी करत आहात? असा सवाल पटेल यांनी उपस्थित केला होता.

Tags

follow us