मोठी बातमी : द.आफ्रिकेत मोठा अपघात; प्रवाशांना घेऊन जाणारे बोइंग 737 विमान धावपट्टीवर कोसळले
Boeing 737 Plane Crashes : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) सेनेगलमध्ये (Senegal) मोठा विमान अपघात (plane crash) झाल्याचे वृत समोर आले आहे. प्रवाशांना घेऊन जाणारे बोइंग 737 विमान सेनेगलमध्ये धावपट्टीवर कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. यात अपघातात 10 जण जखमी झाले असून, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
Gabh Movie: रांगडा अभिनेता कैलास वाघमारेचा ‘गाभ’ चित्रपट ‘या’ दिवशी मराठी रुपेरी पडद्यावर
Boeing 737 plane crashes off a runway in Senegal, injuring 10 people, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) May 9, 2024
प्राथमिक माहितीनुसार, 78 जणांना घेऊन जाणारे बोईंग 737 विमान सेनेगलच्या ब्लेस डायग्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक धावपट्टीवरून घसरले. यामध्ये किमान 10 जण जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, टेक-ऑफ दरम्यान हायड्रोलिक समस्येमुळे विमानाच्या डाव्या पंखाला आणि इंजिनला आग लागली. त्यामुळे पायलटसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरला; वाचा तज्ञांच मत
दरम्यान, या अपघातानंतर सेनेगलची राजधानी डकारजवळील मुख्य विमानतळावरील उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, गवतामध्ये उभ्या असलेल्या या विनालाला आग लागल्याचं दिसत आहेत.
सेनेगलची राजधानी डकार येथील विमानतळावर बोईंग 737 विमान धावपट्टीवरून घसरले, त्यात 79 प्रवासी, दोन पायलट आणि चार केबिन क्रू होते, अशी माहिती वाहतूक मंत्री एल मलिक एनडियाये यांनी एका निवेदनात दिली. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत असल्याचं त्यांनी सांगितलं.