दोघांना चिरडणाऱ्या, अलिशान गाड्यांचे शौकीन 17 वर्षीय मुलाचे वडिल विशाल अग्रवाल कोण?
Kalyani Nagar Car Accident Who Is Vishal Agrawal :19 मे च्या पहाटे दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत ( Kalyani Nagar Car Accident ) एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. सुरुवातीला ही घटना अगदी सामान्य वाटली. मात्र जसजशा या घटनेतील वेगवेगळ्या बाजूस समोर येत गेल्या तस तशी ही घटना चर्चेचा विषय ठरली. कारण अलीशान गाडीने दोघांचा जीव घेणारा हा तरुण पुण्यातील एका बिल्डरचा मुलगा आहे.
‘मला रात्री 3 वाजता फोन आला अन्..,’; अपघातानंतर घडलेलं टिंगरेंनी सांगितलं
तो अपघाताच्या रात्री एका पबमधून पार्टी करून येत होता. तसेच या अल्पवयीन मुलाला कोर्टाने 14 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत सेवक म्हणून काम करणे आणि अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिणे या अटी शर्थींसह जामीनही दिला आहे. दुसरीकडे अल्पवयीन या तरूणाला कार देणारे त्याचे वडिल आणि दारू देणाऱ्या बार मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असा सगळा हा घटनाक्रम मात्र या मुलाला वयाच्या सतराव्या वर्षी कोट्यावधींची गाडी देणारे त्याचे वडिल विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत? पाहुयात…
मोठी बातमी! वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणात बोट उलटली, 7 जण बुडल्याची माहिती
विशाल अग्रवाल हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. ब्रम्हा कॉर्प हा त्यांचा बांधकाम उद्योग समुह आहे. याचे ते प्रमुख आहेत. गेल्या 40 वर्षांपासून हा समुह पुण्यामध्ये बांधकाम व्यवसायात आघाडीवर आहे. ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी हा उद्योग समुह स्थापन केला असून त्यामध्ये अनेक कंपन्या आहेत. तर पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात या समुहाचे मोठे गृहप्रकल्प आहेत. त्याचबरोबर पुण्यातील मेरिडियन हॉटेल, रेसिडेन्सी क्लब यांची बांधकामं देखील या कंपनीकडून केली गेली आहेत. ब्रम्हकोर्प उद्योग समूहातील ब्रम्हा मल्टीस्पेस आणि ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रम्हदत्त अग्रवाल यांच्याकडून त्यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर आता सुरेंद्र यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली आहे.
Kalyani Nagar Car Accident मधील Porsche कार गुगल ट्रेंडमध्ये टॉपला; प्रकरण नेमकं काय?
तर विशाल अग्रवाल यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांना आलिशान गाड्यांचा प्रचंड शौक आहे. यातीलच एक गाडी म्हणजे कोट्यावधींची किंमत असलेली पोर्शे. याच कारने अग्रवाल यांच्या मुलाने दोघांचा जीव घेतला. तर या अगोदर देखील अग्रवाल यांच्या मोठ्या मुलाने अशाच प्रकारे आलिशान गाडी वेगाने चालवून रस्त्यावरील वाहनांसह विजेच्या खांबाचे नुकसान केलं होतं. मात्र त्या प्रकरणाची चर्चा झाली नव्हती.
यावेळी त्यांच्या दुसऱ्या आणि अल्पवयीन मुलाने थेट दोघांचे बळी घेतले असून त्याला जामीनही मंजूर झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे धनिकाचा मुलगा असणे, अल्पवयीन असणे आणि किरकोळ अटी शर्तींसह जामीन मिळत असेल तर कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का? तसेच अल्पवयीन मुलांना पब किंवा बारमध्ये दारू पुरवणाऱ्या बारमालकांचाही प्रश्न अनुत्तरितच आहे.