“माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही, तो मु्ंबईला..”, अपघातानंतर सुरेश धसांनी काय सांगितलं?

“माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही, तो मु्ंबईला..”, अपघातानंतर सुरेश धसांनी काय सांगितलं?

Suresh Dhas Son Car Accident : आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या (Suresh Dhas Son Car Accident) मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली होती. या अपघातात नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सागर धस यांच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

धस पुढे म्हणाले, माझ्या मुलावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे. एका ट्रिटमेंटसाठी तो मुंबईला येत होता. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा कोणताच विषय येत नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजता त्याची सुटका झाली आहे.

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

नेमकं काय घडलं होतं ?

पारनेरच्या सुपा शिवारातील जातेगाव फाट्यावर भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा मुलगा सागर (Sagar Suresh Dhas) याच्याकडील वाहनानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.  या प्रकरणात पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये नितीन शेळके (वय 34, पळवे खुर्द, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

अपघातावेळी वाहनात सागर सुरेश धस आणि सचिन दादासाहेब कोकणे हे दोघे जण होते. अपघातादरम्यान सागर धस यांच्या वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे.  रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. दुचाकीस्वार नितीन शेळके जातेगाव फाट्याकडून पारनेरकडे येत होते. यावेळी सागर धस यांच्या वाहनाने मागून जोरात धडक मारली असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात झाल्यानंतर माहिती सुपा पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान नितीन शेळके यांचा मृत्यू झाला. सागर धस हे रात्री आष्टीवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. पोलिसांनी सागर धस यांच्याकडे असणारी वाहन ताब्यात घेतली असून या अपघाताची नोंद घेतली आहे. या धडकेनंतर दुचाकीचे आणि सागर धस यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर वाहनातील सागर आणि सचिन या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीडमध्ये धुसफूस; आमदार सुरेध धसांनी घतेली मुख्यमंत्र्यांची भेट, पुन्हा धस-मुंडे संघर्ष

follow us
  • fb
  • instagram
  • youtube