जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीडमध्ये धुसफूस; आमदार सुरेध धसांनी घतेली मुख्यमंत्र्यांची भेट, पुन्हा धस-मुंडे संघर्ष

जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीडमध्ये धुसफूस; आमदार सुरेध धसांनी घतेली मुख्यमंत्र्यांची भेट, पुन्हा धस-मुंडे संघर्ष

Suresh Dhas Vs Pankaja Munde : भारतीय जनता पक्षाकडून दोन आठवड्यांपूर्वी ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर झाले होते. (BJP) परंतु, उर्वरित यादी स्थानिक मतभेदांमुळे रखडली होती. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण व केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन यादी निश्चित करण्यात आली. मात्र, पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील दुफळी समोर आली आहे.

काल भाजपने राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. परंतु, यानंतरही पक्षातील मतभेद समोर येऊ लागले आहे. बीड जिल्हाध्यक्ष निवडवरून भाजपमधील गटबाजी समोर आली आहे. प्रभारी असलेले शंकर देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदी कायम केलं आहे. त्यावरून आता भाजप आमदार सुरेश धस यांची नाराजी समोर आली आहे. त्यांच्या गटात उलट-सुलट चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर आजच आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Video : संतोष देशमुखांचा दुसरा पार्ट होता-होता वाचला; आमदार धस परळी प्रकरणावर काय म्हणाले?

शंकर देशमुख हे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या गटातील असून ते आष्टी तालुक्यातील कडा येथील रहिवाशी आहेत. तसंच, नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत धस यांच्या दाव्यानुसार त्यांनी पंकजा मुंडे पुरस्कृत भीमराव धोंडे यांचा प्रचार केला. त्यांनी त्यांच्याच बाजूने काम केलं असा थेट धस यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी निवड ही योग्य नाही अशी चर्चा धस समर्थकांमध्ये आहे.

विधानसभा निवडणूक होताच विजयी सभेत आमदार धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर थेट प्रहार केला होता. त्यांनी आपलं काम केलं नसून त्यांनी शिट्टी या चिन्हावर अपक्ष उमेदवार धोंडे यांचं काम केल्याचा आरोप धस यांनी केला होता. त्यामुळे तेव्हापासून धस-मुंडे संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष निवडीवरून पंकजा मुंडे आणि धस आमने-सामने आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube