Dhananjay Munde : अडीच वर्षे बोललो नाही, फार सहन केलं ; धनंजय मुंडे काय म्हणाले?
Dhananjay Munde : सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर येथे आयोजित मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात बोलताना आमदार धनंजय मुंडे
Dhananjay Munde : सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर येथे आयोजित मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.
दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी या जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. ज्यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळाली त्यावेळी त्यांनी विकास आणला. मला संधी मिळाली तेव्हा देखील विकासकामे झाली मात्र आम्ही टीकेचे धनी होतो. कधी पंकजा मुंडेंवर टीका होते तर कधी माझ्यावर (Dhananjay Munde) टीका होत असते.
अडीच वर्षे मी काहीच बोललो नाही फक्त सहन केलं. मागच्या वर्षी याच मेळाव्यात बोललो होतो आणि यानंतर आज बोलत आहे. बाकी कुठेही व्यक्त झालो नाही. तुम्ही कितीही बोला पण मी बोलणार नाही. कभी-कभी खामोशी भी लफ़्ज़ों की ताक़त से बड़ी होती है असं म्हणत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना टोला लावला.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, जलता चिराग मेरा, हवा मचल रही हैं. इन दिनो हवा तेज चल रही हैं. कुछ मैहफिले ऐसे बैठी हैं मेरी तबाही के लिये. उन्हे मालूमही नही हवा रुख बदल रही हैं… मी पंकजा मुंडे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुम्ही देखील ऊसतोड शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पानाने उभे रहा. कोणाला कसली अडचण आली तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असेही या मेळाव्यात बोलताना आमदार धनंजय मुंडे म्हणाले.
एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिले का? मनोज जरांगेंचा मोठा सवाल-
आज महायुतीचा आमदार म्हणून, मी पंकजा मुंडे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्ही देखील ऊसतोड, शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पानाने उभे रहा. कोणाला कसली अडचण आली तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला संधी मिळाली तेव्हा विकास केला. फार सहन केले, असेही त्यांनी म्हटले.