मोठी बातमी : तमिळनाडूत राजकारण फिरलं; विधानसभेसाठी BJP-AIADMK युतीची घोषणा

BJP-AIADMK form alliance for 2026 Tamil Nadu assembly elections : आगामीकाळात तामिलनाडूत होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि एआयएडीएमके एकत्र निवडणुका लढवतील अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) आज (दि.11) केली. ते तामिळनाडूत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्रितपणे भूतकाळातही मोठे यश मिळवले आहे. यावेळीही जनता एनडीएला बहुमत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Chennai, Tamil Nadu: Union Home Minister Amit Shah on ministerial positions in BJP-AIADMK alliance says, "…We will decide that after winning. I don’t want to leave any confusion for the DMK…" pic.twitter.com/7oaNON1pjg
— IANS (@ians_india) April 11, 2025
पत्रकार परिषदेत अमित शाहंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, १९९८ पासून जयललिता आणि अटलजींच्या काळात आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. एक काळ असा होता जेव्हा आम्ही लोकसभेच्या ३९ पैकी ३० जागा एकत्रितपणे जिंकल्या होत्या. भाजप आणि अण्णाद्रमुकमधील युती केवळ राजकीय नव्हती तर, ती विश्वास आणि विचारसरणीवर आधारित होती.
स्टॅलिनसारखी हिंमत ठाकरेंनी दाखवली असती तर…कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला मोठा खुलासा
मोदी अन् जयललीता यांनी विकासासाठी काम केले
यावेळी शाह यांनी माजी मुख्यमंत्री जयललिता आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंधांची आठवण करून दिली आणि सांगितले की, दोन्ही नेत्यांनी नेहमीच तामिळनाडूच्या (Tamil Nadu assembly elections) विकासासाठी एकत्र काम केले आहे. ही युती दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त असून, आम्ही एकत्र निवडणुका लढवू. मंत्र्यांची संख्या आणि जागावाटपाबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे सांगत सध्या एनडीएचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील भ्रष्ट द्रमुक सरकारला हटवणे असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात; उल्हास बापट नेमकं काय म्हणाले?
शहांचे द्रमुक सरकारवर गंभीर आरोप
यावेळी शाहंनी द्रमुक सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने आतापर्यंत सुमारे ३९,००० कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत, ज्यामध्ये दारू घोटाळा आणि मनरेगा घोटाळा हे प्रमुख आहेत. आम्ही द्रमुक सरकारचे घोटाळे उघड करू असा इशारा देत या भ्रष्टाचारासाठी तामिळनाडूतील जनता स्टॅलिन आणि उदयनिधी यांना कधीही माफ करणार नाहीत असेही शाह यावेळी म्हणाले.