धनंजय मुंडेंनी स्वतः अर्ज देऊन ब्रेन मॅपिंग करावी; देशमुख प्रकरणावरून सुरेश धसांनी मुंडेंना पुन्हा घेरलं
Suresh Dhas यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी गेल्या वर्षी बीडमध्ये घडलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरलं.
Dhananjay Munde should apply for brain mapping himself; Suresh Dhas again besieges Munde over Deshmukh case : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झालं आहे. त्यामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी गेल्या वर्षी बीडमध्ये घडलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरलं आहे. धस नेमकं काय म्हणाले पाहूयात…
देशमुख प्रकरणावरून सुरेश धसांनी मुंडेंना पुन्हा घेरलं
यावेळी लेट्सअप मराठीने धस यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या मूळ आरोपी विषयी विचारले असता. त्यांनी म्हटले की, या प्रकरणातील सर्व आरोपी पकडलेले असून एक आरोपी फरार आहे. पण त्याचा केसवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच मनोज जरांगेंनी देखील धनंजय मुंडेंवर सुपारी दिल्याचा आरोप केला. त्यात दोन आरोपी पकडले गेलेले आहेत. त्यांनी आम्हाला यासाठी कोट्यावधी रूपये मिळणार असल्याचं म्हटलं होतं.
त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याचे म्हटले होते. त्यामुळे जरांगेंनी पत्र दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी देखील कोर्टात पत्र देऊन आपली नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करून घ्यावी. ते स्वत: कबूल करून देखील ही टेस्ट करत नसल्याने जरांगे त्यांच्यावर रागावलेले आहेत. असं म्हणत देशमुख प्रकरणावरून सुरेश धसांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना घेरल्याचं पाहायला मिळालं.
