Suresh Dhas : आका म्हणाले, पकडू नका; धसांनी जुनं खून प्रकरण उकरून काढत टाकला नवा बॉम्ब…
Suresh Dhas Criticized Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. हत्या प्रकरणातील कराड अन् त्याच्यासोबतचे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत. वाल्मिक कराड (Walmik Karad) खून प्रकरणात नाहीत, यात उगाचच गोवलं जातंय. असा आरोप होत आंदोलनं केली जात होती. यावर आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, यांनी संतोष देशमुखचा खून केलाय. हेच खंडणी मागत होते. 29 तारखेचा हा व्हिडिओ आहे. तेव्हाच अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला उचलल्याची घटना घडली होती. या व्हिडिओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे दिसत आहेत.
गूढ आजाराची एन्ट्री! 17 जणांचा मृत्यू, अख्खं गाव कंटेनमेंट झोन घोषित; कुठं आलंय नवं संकट?
ज्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, ते असे आंदोलन करीत आहेत. वाल्मिक कराड अन् गॅंगने संतोष देशमुख यांची हत्या केलीय. माझ्याकडे महादेव मुंडे यांचं प्रकरण आलंय. त्यांचा 23 ऑक्टोबर 2023 रोजी मर्डर (Santosh Deshmukh Murder) झालाय. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपी डिटेक्ट झालेत, पण अटक झाले नाहीत. हे सर्व आरोपी आकाच्या पोराभोवती फिरत आहेत. महादेव मुंडे दुधाचा धंदा करत होता. जे सहा आरोपी आहेत, त्यांची नावं डिटेक्ट झाले होते. सानप नावाचे पीआय त्यांना पकडायला गेले होते, तेव्हा त्यांना धमकी दिली. दुसऱ्या लोकांना पकडायला सांगितलं. परंतु सानप म्हणाले, हे पाप मी करणार नाही. त्यानंतर ते बदली करून निघून गेले.
“धनंजय मुंडेंनी दहशत केली, त्यांनाच पहिली अद्दल घडली पाहिजे”; दमानियांचा घणाघात
सहा आरोपी आहेत. ते सहा आरोपी सुनिल कराडभोवती फिरत आहेत. ते आता अटक झाले पाहिजे. महादेव दत्तात्रय मुंडे या गरिब माणसाला त्यांनी भोकसलं. त्यानंतर दागिने घेवून पळाले. हे सगळे गांजाडे, ड्रग्स घेणारे लोकं वाल्मिक कराडचे असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केलाय. पंधरा मर्डर झालेत. त्यापैकी दहा ते तेरा वंजारी समाजाचे आहेत. वंजारी समाजाचे माणसांना मारतात अन् वरून पुळका आणतात, अशी टीका देखील धस यांनी केलीय.
पिकविमा घोटाळा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे, असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. मुख्यमंत्री म्हटलेय, या प्रकरणाची चौकशी करू. अजितदादा पालकमंत्री व्हावे, ही मागणी आम्हीच केली होती. दादा आलेत आता चांगली गोष्ट झालीय. मटके, गुन्हेगारी या सगळ्यांना अजितदादा आणि मुख्यमंत्री नक्कीच आळा घालतील. अजितदादा आल्यामुळे नक्की बदल होणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलीय. अजितदादा धनंजय मुंडेंना थारा देणार नाही. मी त्यांच्यासोबत दहा वर्ष काम केलंय, असं देखील धस म्हणालेत.