Suresh Dhas : छोटा आका कोण अन् मोठा आका कोण?, सुरेश धस यांनी पहिल्यांदाच घेतली थेट नावं
Suresh Dhas on AAka Name : बीड जिल्हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात प्रामुख्याने ज्यांचं नाव घेतलं जात होत ते वाल्मिक कराड हे काल सीआयडीला शरण आले आहेत. त्यानंतर इतर तीन आरोपींचाही शोध सुरू आहे. (Suresh Dhas) दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस हे कुणाचं नाव घेत नव्हते. ते आका म्हणत होते. मात्र, त्यांनी आता हे आका कोण आहेत त्यांची थेट नावच घेतली आहेत.
वाल्मिक कराड CID समोर शरण होताच घडामोडींना वेग; सुरेश धस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
संतोष देसमुख यांच्या हत्येच प्रकरण झाल्यानंतर विधानसभेत आमि विधानसभेच्या बाहेरही न्यायाची मागणी करत ज्यांनी थेट भूमिक घेतली ते आमदार सुरेश धस मोठे चर्चेत आहेत. ते कायम माध्यमांच्या गराड्यात पाहायला मिळत आहेत. दरम्यान, यामध्ये बोलत असताना त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत असताना फक्त आका या शब्दाचा उल्लेक केला होता. त्यांनी कधीही थेट वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे अशी नाव घेतली नाहीत. मात्र, त्यांनी एका मुलाखती दरम्यान, वाल्मिक कराड हे छोटे आका आणि धनंजय मुंडे हे मोठे आका असा उल्लेक केल्याने खळबळ उडाली आहे.
मागच्या काळात धनंजय मुंडे हे दोनवेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या या काळात हे पालकमंत्रीपद त्यांनी नाही तर वाल्मिक कराडने चालवल. तसच, त्यांचं कृषीमंत्रीपदही त्यांनी असंच भाड्याने दिलं होतं. त्यामुळे परळी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर हे दिवस आले आहेत असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यांना पालकमंत्रीपद देऊन काय केलं याचाही खुलासा व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.