वाल्मिक कराड ‘CID’ समोर शरण होताच घडामोडींना वेग; सुरेश धस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • Written By: Published:
वाल्मिक कराड ‘CID’ समोर शरण होताच घडामोडींना वेग; सुरेश धस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Suresh Dhas meets CM Fadnavis : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज जालन्यात अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये सुमारे अर्धा ते तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. (Suresh Dhas ) दरम्यान, फरार असलेले वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आले आहेत. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.

आधी व्हिडीओ बनवला, मग शरण गेला; वाल्मिक कराडच्या सरेंडरची स्टोरी

दरम्यान, माध्यामांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, वाल्मिक कराड जरी म्हणाले की यामध्ये राजकारण आहे तरी हे राजकारणाचा भाग नाही. हे धंदे करायला त्यांना कुणी सांगितलं होत असंही सुरेश धस म्हणाले आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं त्याचा विचार करता तुम्हाला कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही सुरेश धस म्हणाले आहेत. तसंच, त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजनाना घ्यायचा की नाही हा अधिकार सरकार आणि प्रामुख्य्याने अजित पवार यांचा आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे असंही धस यावेळी म्हणालेत.

मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांनी भेट घेतली. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख हे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर सर्व प्रकार टाकला. आपल्या भावाचे मारेकरी अद्यापही मोकाट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर आरोपींना कुठपर्यंत अटक होत नाही ते आपण पाहू. हे लोक आपल्याला फक्त घुमवतात का तेही पाहू असंही ते म्हणाले आहेत.

जर काहीच होत नसेल तर आपल्याकडे जनतेचं शस्त्र आहे. जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण दाद मागू, असं मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय यांना सांगितलं. धनंजय देशमुख यांचा सीआयडीने जबाब नोंदवला होता. धनंजय यांना नोटीस बजावून सीआयडीने बोलावलं होतं. त्यानंतर आज धनंजय यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube