महापालिकेचं रणांगण तापलं! महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस अहिल्यानगरच्या मैदानात
CM Fadnavis यांची जाहीर सभा अहिल्यानगर शहरात होत असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
municipal battleground CM Fadnavis in Ahilyanagar ground to campaign for the Mahayuti : महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी अहिल्यानगर शहरात सर्वत्र युतीला सकारात्मक व चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा नगर मध्ये होत असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. उद्या शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
मोठी बातमी! मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर युतीचे अधिकृत उमेदवार आणि आपल्या शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘जाहीर प्रचार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. उद्या गुरुवार, 8 जानेवारी 2026, दुपारी 1:०० वाजता पांजरपोळ ग्राऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, मार्केट यार्ड चौक, अहिल्यानगर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
मी करेन, विवाह करेन…चाहत्याचा प्रश्न अन् अभिनेत्री श्रद्धा कपुरचं उत्तर
या पार्श्वभूमीवर या सभेच्या स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी आज सकाळी माजी खासदार डॉ.सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन कुंकूलोळ, विकी जगताप आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व ६७ उमेदवारांसाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
