मी करेन, विवाह करेन…चाहत्याचा प्रश्न अन् अभिनेत्री श्रद्धा कपुरचं उत्तर

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अजूनही राहुल मोदीसोबतच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, त्यावर चाहत्यांनी प्रश्न केला.

News Photo   2026 01 07T174120.590

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. (Film) चित्रपटांसोबतच श्रद्धाची लव्ह लाइफ कायमच चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरते. श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रापेक्षाही जास्त आहे. एकीकडे चाहते श्रद्धाच्या साधेपणावर फिदा होतात, तर दुसरीकडे तिच्या मनावर सध्या फक्त राहुल मोदीचं राज्य असल्याचं बोललं जातंय.

गेल्या काही काळापासून श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्यातील नात्याच्या चर्चा जोरात आहेत. दोघांनीही कधीच अधिकृतपणे आपल्या नात्याबद्दल कबुली दिलेली नसली, तरी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय. अशातच श्रद्धाने स्वतः तिच्या लग्नावर प्रतिक्रिया दिल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या बर्‍याच काळापासून बॉलिवूडच्या वर्तुळात श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. आता पुन्हा एकदा श्रद्धा कपूर तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे, पण यावेळी विषय थेट तिच्या लग्नापर्यंत जाऊन पोहोचला आहे. लवकरच लग्नगाठ बांधण्याची तयारी आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कियारा अडवाणीपासून ते कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोणपर्यंत अनेक अभिनेत्री लग्न झालंय. अनेकींनी गुडन्यूजही दिलीय. आता फक्त चाहत्यांना प्रतीक्षा आहे, ती त्यांच्या लाडक्या श्रद्धा कपूरच्या घरी शहनाई कधी वाजणार याची. मंगळवारी श्रद्धा कपूर तिचा ज्वेलरी ब्रँड इंस्टाग्रामवर प्रमोट करत होती.

रणवीरने रचला इतिहास, ‘पुष्पा 2’ ला मागे टाकत ‘धुरंधर’ ठरला बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट

या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “खरं सांगायचं तर व्हॅलेंटाईन डेच्या आसपासच सगळ्यात जास्त ब्रेकअप्स होतात. 3-4 वेळा ‘धुरंधर’ पाहिला, न्यू ईयरला पार्टी केली आणि जिम मेंबरशिपही घेतली. बजेट संपलं… सिग्नलवरून विकत घेतलेला गुलाब दिला, तर ब्रेकअप कसं नाही होणार? हा प्रॉब्लेम मला समजतो, म्हणूनच तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डेचे स्पेशल गिफ्ट्स बनवले आहेत, जेणेकरून तुम्हाला एफडी तोडावी लागणार नाही.”

याच दरम्यान कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने श्रद्धाला थेट विचारलं की ती लग्न कधी करणार आहे? चाहत्यांच्या कमेंट्सना मोकळेपणाने उत्तर देणारी श्रद्धा कपूर या प्रश्नापासून पळाली नाही. उलट तिने मजेशीर अंदाजात उत्तर देत लिहिलं, “मी करेन, विवाह करेन.”

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हा अधिक जोरात पसरल्या, जेव्हा 2024 मध्ये दोघांना मुंबईत एकत्र डिनर डेटवर स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र, श्रद्धा कपूरने अजूनही राहुल मोदीसोबतच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. राहुल मोदी पेशाने लेखक असून त्यांनी ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांचं लेखन केलं आहे.

राहुल मोदीच्या आडनावामुळे “श्रद्धा मोदी कुटुंबाची सून होणार का?” असा प्रश्नही सतत विचारला जात आहे. मात्र, या सर्व चर्चांवर श्रद्धा किंवा राहुलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या तरी श्रद्धाने दिलेल्या एका ओळीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता श्रद्धा कपूर खरंच कधी आणि कोणासोबत लग्न करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

follow us