भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात; पुनावळे गावठाण येथे राहुल कलाटे यांचा नागरिकांशी संवाद

PCMC Election 2025: : पाणीपुरवठा, रस्ते, धूळ व प्रदूषण, नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध विकास या प्रश्नांसाठी आपण सातत्याने लढा दिला-राहुल कलाटे

  • Written By: Published:
Rahul Kalate Pcmc Election 2026 Rahul Kalate's interaction with citizens at Punawale village

PCMC Election 2025: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC Election 2025) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) तील पुनावळे गावठाण येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या निमित्ताने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेद्वारे परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रभाग क्रमांक २५ (ड) चे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्यासह कुणाल वाव्हळकर, श्रुती राम वाकडकर आणि रेश्मा चेतन भुजबळ, चेतन भुजबळ, नवनाथ ढवळे, राम वाकडकर, व विशाल कलाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Rahul Kalate’s interaction with citizens at Punawale village)

पदयात्रेचा मार्ग काळ भैरवनाथ मंदिर, बोरगे वाडा, ओव्हाळ वस्ती, सावतामाळी मंदिर मार्गे पुनावळे हायवे चौक असा होता. यावेळी बोलताना राहुल कलाटे यांनी आपल्या वीस वर्षांतील संघर्षाचा उल्लेख केला. हा संघर्ष कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, केवळ लोकांसाठी आणि लोकांच्या प्रश्नांसाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पाणीपुरवठा, रस्ते, धूळ व प्रदूषण, नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध विकास या प्रश्नांसाठी आपण सातत्याने लढा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिक कर भरतात, मात्र त्या तुलनेत दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत, हीच आपली भूमिका राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली राजकीय भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, आपला प्राधान्यक्रम नेहमी नागरिकांचे काम करणे हाच राहिला आहे. केवळ निवडणूक जिंकणे हा मुद्दा नसून, या भागातील विकासातील दरी भरून काढणे आणि त्या विकासाला गती देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी सक्षम सरकारची साथ आवश्यक असून, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा विकास वेगाने साध्य होऊ शकतो”, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भाषणाच्या शेवटी राहुल कलाटे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर प्रत्येकाने पूर्ण ताकदीने मतदान करावे. या भागातील प्रत्येक प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा आपला शब्द असून, शब्दाला पक्का राहणारा कार्यकर्ता म्हणून नागरिकांचा विश्वास आपण कधीही डगमगू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पदयात्रेला पुनावळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह संतोष पवार, नवनाथ ढवळे, लक्ष्मण कोयते, शंकर नाना गायकवाड, हुशार अण्णा भुजबळ, संभाजी शिंदे, सुभाष रानवडे, सुनील ढवळे, अतुल ढवळे, किरण बोरगे, सुरेश भुजबळ, रामदास कुदळे, संतोष दर्शले, चंद्रकांत दर्शले, नवनाथ ताजने, संदीप ताजने, अजिंक्य गायकवाड, धनाजी कोयते, विलास बोरगे, तानाजी शिंदे, भरत काटे, मुकुंद जाधव, माऊली काटे, राहुल काटे, सुरेश रानवडे , राजाराम काटे, सचिन पांढरे, अक्षय पांढरे उपस्थित होते.

यावेळी पीसीएमसीचे ओबीसी अध्यक्ष चेतन भुजबळ म्हणाले, राहुल कलाटे यांच्या नेतृत्वात प्रभाग 25 मधून भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी होईल याबद्दल विश्वास आहे. राहुल दादांनी यापूर्वी प्रभागात नगरसेवक म्हणून उत्तम कामं केली आहेत. येत्याकाळात त्यांच्या खाद्याला खांदा लावून आम्ही पूनावळेचा विकास करु

उमेदवार राहुल कलाटे म्हणाले, विकासकामे मार्गी लावत असताना अनेक अडथळे आले, तरीही त्यावर मात करून पाण्याच्या टाक्या, डीपी रस्ते, ऑक्सिजन पार्क, ओपन जिम यांसारखी कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे राहुल कलाटे यांनी सांगितले. अजूनही अनेक कामे करायची असून, लोकांना सर्वोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

follow us