ऊस दिसला नाही अन् दादांनी चेअरमनला फोन लावला; जयंत पाटलांनी सांगितला अजितदादांचा ‘तो’ किस्सा
Jayant Patil : कुणाची नजर लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आहे. दादांसारखा नेता आपल्यातून गेला.
Jayant Patil On Ajit Pawar:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनावर मांडलेला शोक प्रस्तावावर पांठिबा देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. कुणाची नजर लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आहे. दादांसारखा नेता आपल्यातून गेला. मोठ्या अपेक्षाने महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहात होता, अशी श्रद्धांजली राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जयंत पाटील यांनी वाहिली. तसेच अजित पवार यांच्याबरोबरीचा आठवणीही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभागृहात सांगितले.
1998 ला दादा राज्य बँकेचे अध्यक्ष झाले आणि मी साखर संघाचा अध्यक्ष झालो. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश दौरा सुरू केला. काही कारखान्यांनी साखर संघाचे व राज्य बँकेचे अध्यक्ष येणार म्हणून काही कारखान्यांना ऊस नसला तरी कारखाने चालू ठेवले होते. बँकेकडून मदत मिळवायची होती. आम्ही एका कारखान्यावर गेलो, त्या कारखान्याच्या परिसरात ऊस नव्हता. तेव्हा कारखानाचा अध्यक्ष म्हणाला, दादा त्या बाजूला ऊस नाही, दुसऱ्याला बाजूला ऊस आहे. आमचा कारखान्यावर मोठा सत्कार केला. पण आम्हाला कारखान्यामध्ये काही नेलं नाही. कारखान्याचे धुराडे मात्र सुरू होते. तेव्हा दादा चला म्हणाले, आम्ही गाडीत बसलो. पण मी दादाला म्हटलं आता दुसऱ्या बाजूने जाऊ. आम्ही गेलो पण तिकडे ही ऊस नव्हता. दादांनी लगेच कारखान्यांच्या अध्यक्षाला फोन लावला. इकडे ऊस नाही, तिकडे ही ऊस नाही. आम्हाला मूर्ख समजतो का ? असा किस्सा जयंत पाटील यांनी सांगितले. प्रत्येकाला वाटायचे दादा तापट आहेत, चिडतात. पण दादा फार धोरणी होते. दादांची राजकीय समाज प्रचंड होती, पुढे काय होणार हे माहित होतं, असं जयंत पाटील म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटलांना घ्या आपल्याकडे-जयंत पाटील
आमचे सतरा आमदार निलंबित केल्यानंतर आम्ही संघर्ष यात्रा काढली होती. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच गाड्यांची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. तेव्हा राधाकृष्ण विखेंना आपल्याकडे खेचले पाहिजे, चांगली व्यवस्था करतात, असे अजितदादा म्हणाले. दादांचा प्रशासनावर प्रचंड वचक होता. क्षमता खूप होती, भविष्यकाळात कधींना कधी प्रमुखपदावर बसले असते. अलीकडच्या काळात आमचा स्नेह जवळचा झाला होता. आमच्या त्यांच्या बैठका झाल्या आहेत. ते माझ्याकडे जेवायला यायचे. ते खूप खूश असायचे, असे जयंत पाटील म्हणाले. योग्य वेळी योग्य निर्णय असं आमचं ब्रिदवाक्य होतं. पण हा एकच निर्णय दादांचा चुकला, असं सांगत जयंत पाटील भावूक झाले.
