जयंत पाटील आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली ? मला माहिती नाही; सुप्रिया सुळेंची थेट प्रतिक्रिया
Supriya Sule - मी आणि विनोद तावडेही भेटतो. आम्ही एनडीए, महायुतीमध्ये येण्याबाबतच्या बातम्या सुरू आहेत. याची मला गमंत वाटत आहे.
Supriya Sule On ncp joining NDA: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडून सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. आता शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसही एनडीएबरोबर (NDA) जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यात एक मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली आहे.
जमीन बळकावण्यावर नवा कायदा; विद्यमान व्यवस्था अपुरी का ठरली?, सरकारने आकडेवारी जाहीर करावी
जयंतराव पाटील आणि विनोद तावडे यांची बैठक कुठे झाली ? मला माहिती नाही, असे थेट उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. मी आणि विनोद तावडेही भेटतो. आम्ही एनडीए, महायुतीमध्ये येण्याबाबतच्या बातम्या सुरू आहेत. याची मला गमंत वाटत आहे. मी आणि विनोद तावडे अनेकदा भेटलो आहेत. आम्ही एका पार्लमेंट्री कमिटीमध्ये आहोत. गेल्या आठवड्यात दोन वेळा या कमिटीच्या बैठका झाल्या आहेत. विनोद तावडे, अनुराग ठाकूर, काँग्रेसचे लोक बैठकीला असतात, असे सुळे म्हणाल्या.
आता भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे. बारा वर्षांपासून सत्तेत आहेत. ते घरे फोडून, पक्ष फोडून आपल्याबरोबर घेत आहे. आता सत्तेला एक दशत झालेले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला नावे ठेवून प्रश्न सुटणार नाही. त्यांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आम्ही भाजपबरोबर जाणार हे आमच्याबाबत बारा वर्षापासून बोलले जाणार आहे. 2029 ला राष्ट्रवादी व काँग्रेसला लढून सत्ता घ्यावी लागणार असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
मिसिंग लिंकची चौकशी करा: सुळे
मिसिंग लिंकचा गाजावाजा करून उद्घाटन झाले. पहिल्याच पावसाचा मोठी घटना घडली आहे. अठरा तास मिसिंग लिंक बंद होती. त्याची चौकशी केली पाहिजे. यावर कंत्राटदारांनी उत्तरे दिले पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केलीय.
यांनी प्रभू रामाला सोडले नाही
प्रभू श्रीरामाने मर्यादा शिकविल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात भ्रष्टाचार झाला आहे. हा त्यांचा गलिच्छ कारभार झाला आहे. त्याचा निषेध करते. यावर काय बोलविणार आहे, असा सवाल सुळे यांनी केलाय. लोकसभेच्या अधिवेशनात सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि प्रभू श्रीराम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.