Video : जे कायद्यातच नाही ते शिक्षकांच्या वाट्याला; TET’चं बंधन हा अन्याय, दत्तात्रय सावंत आंदोलनाच्या तयारीत
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी लेट्सअप विशेष या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी TETचा मुद्दा आणि शिक्षणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
विद्यार्थ्यांचा हक्क आहे शिक्षण मिळण्याचा. (Teacher) महाराष्ट्र सरकारने 13 फेब्रुवारी 2013 ला एक आदेश काढला. त्यावेळी सरकारने सांगितलं 1 ते 8 पर्यंत ज्या शिक्षकांची नियुक्ती होईल ते टीईटी पास पाहिजेत. दरम्यान, 15 डिसेंबर 2013 ला परिक्षा झाली. निकाल लागला मार्च 2014 मध्ये. आपण सगळे प्रगत असताना, कायदे असताना अशा घटना घडतात. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं जे लोक सेवेत आहेत त्या सर्वांना हा नियम लागू. पण विचार केला तर 2000 ला 2001 ला 2009 ला हा नियम लागू कसा होणार? कारण त्यावेळी कायदाच नव्हता असा मोठा खुलासा करत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी लेट्सअप विशेष या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिक्षक मतदारसंघाची रचना, पेन्शनचा प्रश्न, TETचा मुद्दा आणि ‘वारे गुरुजी’ प्रकरणावर आपली स्पष्ट आणि विस्तारीत भूमिका मांडली आहे.
खर तर या परिक्षेचीच गरज नाही. मी शिक्षक आहे. शिक्षकासाठी डीए़ड बीएड ही पात्रता आहे. वरती सीएटी पीएचडी आहे. हे सगळे कायदे नियम आहेत. परंतु, अगोदरच्या बांधवांना सांगितल्याने अनेकांची फजिती झाली आहे. 1992 च्या आणि 1995 च्या लोकांना जर टीएटी द्यावी लागत असेल. काही लोकांना सेवेचे सेवटचे काही वर्ष राहिलेले असताना जर ही परीक्षा द्यावी लागत असेल तर खूप गंभीर आणि अन्यायकारक मुद्दा आहे असंही ते म्हणाले. आता अनेक राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. त्यावर एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यातही विधी व न्याय खात्याने राज्य सरकारला सल्ला दिला अशी पुर्विचार याचीकाच दाखल करता येणार नाही. आता सर्व लोकांनी आवाज उठवल्यावर याचिका करण्यास सहमती दर्शवली आहे असंही ते म्हणाले.
आता मी कार्यकर्ता म्हणून मी पुणे विभागात 12 खासदार आहेत. त्या सगळ्यांना निवेदन दिले आहेत. त्यातील अनेक खासदारांनी लोकसभेत प्रश्नही विचारले आहेत. त्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक उत्तर दिली आहेत. आता मी धर्मेंद्र प्रधान यांना भेटणार आहे. दरम्यान, हे सगळं यावर सकारात्मक घडलं तर ठीक नाहीतर मी जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर पेपर फुटीवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. आज अनेक बांधवांची अवस्था म्हणजे, कुणीच काही कारवाई करत नाही म्हणून हे वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मी आता मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना भेटून हे कधी थांबणार हे विचारणार आहे असंही ते म्हणाले.
मी स्वत: आमदार असताना शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर विधीमंडळात बोललो आहे. काही शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांना त्रास दिला जातो हे खरच आहे असंही सावंत यावेळी म्हणाले. आज अनेक शिक्षण संस्थांच नाव चांगलं आहे पण तिथं अनेकांना त्रास दिला जातो, ते थांबलं पाहिजे. पण काही छोट्या संस्था आहेत त्यामध्ये ते खूप चांगलं काम करत आहेत. त्याचबरोबर पवित्र नावाचं जे काही पोर्टल आलं आहे ते आणखी सक्षम केलं पाहिजे. त्यामधून अनेक लोकांना चांगली संधी मिळत आहे. यामधून खूप चांगली मुलं आले आहेत असा दावाही सावंत यांनी यावेळी केला आहे. तसंच, काही शाळांत शून्य टक्के निकाल लागतो हे धक्कादायक आहे. तसा लागलाच नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले.