Bogus Teachers Scam : धक्कादायक! नागपूरच्या खासगी शाळांत तब्बल 580 बोगस शिक्षक, शासकीय तिजोरीला कोट्यवधींचा चुना

Bogus Teachers Scam : धक्कादायक! नागपूरच्या खासगी शाळांत तब्बल 580 बोगस शिक्षक, शासकीय तिजोरीला कोट्यवधींचा चुना

Nagpur Bogus Teachers Appointment Scam : नागपूर जिल्ह्यामध्ये खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक, दोन नाही तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती (Nagpur Bogus Teachers) केली. वेतनापोटी सरकारी तिजोरीला चक्क कोट्यवधींचा चुना लावल्याचं उघड झालंय. खुद्द शिक्षण विभागानेच हे त्यांच्या एका आदेशात मान्य केल्याचं समोर आलंय. त्यामुळं मोठी खळबळ (Nagpur News) उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यांतील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 580 बोगस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर (Bogus Teachers Appointment Scam) आलंय. याप्रकरणी तीन जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यावधी रूपयांचा चुना लावल्याचं उघडकीस आलंय. खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशामध्ये मान्य केलंय.

भाजप भाकरी फिरवणार! शेलारांच्या जागी मुंबई अध्यक्षपदासाठी 2 बड्या नेत्यांची नावं, कोणाची वर्णी?

दरम्यान आता या प्रकरणात महाराष्ट्र शिक्षण परिषदेने देखील उडी घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी देखील केली आहे. 2019 ते 2022 दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या शिक्षकांच्या बहुतांशी नियुक्त्या बेकायदेशीर पद्धतीने आहेत. त्यापैकी बहुतांशी शिक्षक केवळ कागदावर अस्तित्वात आहेत. त्यांच्या नावाचं वेतन घेतलं जात असल्याचं उघडकीस आलंय. यामुळे शासकीय तिजोरीला मोठा फटका बसलेला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये निलेश मेश्राम, संजय दुधाळकर, सुरज नाईक यांचा समावेश आहे. या अनुषंगाने तपास सुरू आहे. अजून या प्रकरणात किती लोकं सामील आहेत, याचा मुख्य सुत्रधार कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Sujay Vikhe : सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात…पुढाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका; विखेंचा खोचक टोला

मागील काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यामध्ये बोगस मुख्यध्यापकाच्या भरतीवरून दोघांना अटक झाली होती. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील एका शाळेमध्ये बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली होती. तसेच बोगस नेमणूक मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना देखील अटक करण्यात आली होती. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक झाली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube