भाजप भाकरी फिरवणार! शेलारांच्या जागी मुंबई अध्यक्षपदासाठी 2 बड्या नेत्यांची नावं, कोणाची वर्णी?

भाजप भाकरी फिरवणार! शेलारांच्या जागी मुंबई अध्यक्षपदासाठी 2 बड्या नेत्यांची नावं, कोणाची वर्णी?

Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार आहे, यासाठी दोन बड्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. आता या पदावर कोणाला (Pravin Darekar) संधी मिळतेय? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागलं आहे. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायलं मिळतंय. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि (Maharashtra Politics) आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची एकत्र बैठक सुरू आहे. त्यामुळे आशिष शेलारांच्या (Ashish Shelar) जागी नवा अध्यक्ष कोण? याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

भारतीय UPI प्रणाली धोक्यात? मागील 15 दिवसांत तिसऱ्यांदा UPI क्रॅश…

आज आम्ही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी नवीन अध्यक्ष नेमण्याच्या तयारीत आहोत. यासंदर्भात महत्वाची बैठक सुरू असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगितलं जातंय. कारण, सध्याचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे मंत्रि‍पदावर असल्यामुळे आशिष शेलार यांना मुक्त करून, त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्ष आणण्यासाठी भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर देखील नवीन प्रदेशाध्यक्ष येतील. त्याचसोबत मुंबईच्या अध्यक्षांची देखील बदली करण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रवीण दरेकर अन् अमीत साटम या दोघांचं नाव चर्चेत आहे. आशिष शेलार मंत्रि‍पदी असल्यामुळे त्यांच्यावरील भार कमी करण्यासाठी, भाजप अध्यक्ष बदलत असल्याचं समोर आलंय.

फेक एन्काऊंट कसा करतात?, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची… कासलेंचे खळबळजनक दावे

येत्या काही महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. 2017 मध्ये मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक झाली. त्यावेळी भाजप स्वबळावर निवडणूक लढलं होतं. भाजपने 31 वरुन 82 जागांवर झेप घेतली होती. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांनी भाजपचं नेतृत्त्व केलं होतं. त्यावेळी मुंबई भाजपचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. अजूनही शेलारांकडेच मुंबई भाजपची सुत्रं असल्याचं कळतंय. मुंबई भाजपचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली आता सुरु झाल्यात. त्यासाठी पक्ष मुख्यालयामध्ये बैठकीला सुरुवात झाल्याचं कळतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube