भारतीय UPI प्रणाली धोक्यात? मागील 15 दिवसांत तिसऱ्यांदा UPI क्रॅश…

Mobile Payment Services Crash Impact UPI Down : तुम्ही पण पेटीएम, जीपे, फोनपे सारख्या अॅप्सवरून पेमेंट करता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. युपीआयमुळे (UPI) आपण रोख रक्कम जवळ बाळगणं बंद केलंय. दर तासाला भारतात अडीच कोटींहून जास्त युपीआय व्यवहार होतात. पण या सगळ्यांना मात्र 12 एप्रिल रोजी मोठा धक्का (Mobile Payment Services) बसला. अचानक पेटीएम, जीपे, फोनपे सारख्या अॅप्सवरून पेमेंट अयशस्वी होऊ लागले. मागील 15 दिवसांत हे तिसऱ्यांदा घडतंय, बरं का. यामुळे भारतीय UPI प्रणाली धोक्यात आहे का? असा सवाल निर्माण होतोय.
15 दिवसांत तिसऱ्यांदा UPI क्रॅश
मागील 9 वर्षांत UPI आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. डिजीटल पेमेंट अन् सोपे व्यवहार…यामुळे रोज देशात 80 हजार कोटींचे व्यवहार UPIद्वारे होतात. एप्रिल 2016 मध्ये युपीआय लॉंच करण्यात आलं. ही सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय चालत होती. पण मागच्या पंधरा दिवसात तीन वेळा युपीआय बंद पडले. अनेक वापरकर्त्यांच्या पैशाच्या व्यवहारांना विलंब झाला. अनेकांचे पेमेंट फेल झाले.
26 मार्च 2025 रोजी UPI सेवा सुमारे 3 तास बंद होती. लोकांना गुगल पे, फोनपे आणि पेटीएमवरून पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी आल्या. 10 हून अधिक बँकांच्या UPI आणि नेट बँकिंग सेवांवरही परिणाम झाला. आउटेज ट्रैकिंग साइट डाउनडिटेक्टरनुसार, या काळात 3 हजारांहून अधिक तक्रारींची नोंद झाली.
मी पक्षासाठी लाठ्या खाल्ल्या, हा नंतर आला अन् येऊन काड्या करतो; खैरेंनी घेतला दानवेंचा समाचार
2 एप्रिल 2025 रोजी अनेक बँकांच्या UPI आणि मोबाईल बैंकिंग सेवांमध्ये समस्या निर्माण झाली होती. याकाळात 5 हजार वापरकर्त्यांनी एसबीआयची सेवा बंद असल्याची तक्रार केली होती. 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडे अकरानंतर सुमारे 3 ते 4 तास UPI सेवा बंद होती. 81 टक्के लोकांना पेमेंट करण्यात, 17% लोकांना पैसे पाठविण्यात अन् 2% लोकांना खरेदी करण्यात समस्या येत होत्या
UPI सेवा वारंवार बंद होण्याचे कारण काय?
UPI हा पैसे पाठविण्याचा एक डिजीटल मार्ग आहे. याद्वारे एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत मोबाईलद्वारे त्वरित पैसे पाठवता येतात. काही बँकांकडून व्यवहारांच्या यश दरातील चढ-उतारांमुळे UPI सेवा अंशतः बंद असल्याचं सांगितलं जातंय.
इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, आजकाल गेमिंग अप्समध्ये UPI व्यवहार खूप वाढले. परिणामी सर्व्हरवरील भार वाढला. त्यामुळे सेवा बंद आहे. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2025 पर्यंत दररोज सुमारे 52 कोटींचे व्यवहार होत होते, परंतु मार्चमध्ये ते 60 कोटी झाले. फेब्रुवारीत सुमारे 1,610 कोटी रुपयांचे व्यवहार झाले, तर मार्चमध्ये ते 1830 कोटी रुपये होते. एनपीसीआयने आंतरराष्ट्रीय UPI व्यवहारांसाठी क्यूआर कोडचा वापर मर्यादित करत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे UPI च्या बँकएंडवर काही काम चालू असल्यामुळे कदाचित सर्व्हर त्यात व्यस्त असू शकते. UPI समस्या NPCI च्या सिस्टीमपेक्षा बँकांच्या सर्व्हरशी संबंधित असतात. एसबीआय, एचडीएफसी अन् इतर बँकांनी देखभाल किंवा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितलं. 12 एप्रिल रोजी UPI डाउन होण्यामागे तांत्रिक समस्या असल्याचं सांगितलं जातंय.
Phone Blast Issue : सावधान! तुमच्यापण फोनचा स्फोट होऊ शकतो…
भविष्यात UPI सेवा बंद पडणार?
सारखं सारखं UPI क्रॅश होतंय, त्यामुळे भविष्यात UPI सेवा बंद पडणार का? असा सवाल निर्माण होतोय. तर युपीआय व्यवहारांत येण्यापूर्वी एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत पेमेंट करण्यासाठी व्यवहार शुल्क आकारले जात होते. सगळ्या बॅंकांकडे वेगवेगळे अॅप्स होते. परंतु हे सोपं करण्यासाठी NPCI ने UPI लॉंच केलं. एनपीसीआयचे नेटवर्क सर्व बँकांमधील पेमेंटसाठी काम करते असल्यामुळे व्यवहार शुल्क कमी झालं. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पेमेंट करणं देखील सोपं झालंय.
बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित ?
UPI सारखं सारखं बंद पडत असल्यामुळे बॅंकेत ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडतोय. हो…तुम्ही बॅंकेत ठेवलेले पैसे पुर्णपणे सुरक्षित आहे. UPI सेवा बंद असल्यास त्याचा परिणाम होत नाही. UPI पेमेंट हे देखील सुरक्षित आहे. प्रथम UPI अॅप्समध्ये लॉक किंवा फिंगरप्रिंट असते. व्यवहार करण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक वेळी UPI पिन एंटर करावा लागतो. बँका अन् NPCIचे सर्व्हर अधिक सुरक्षित आहेत.