दोन हजार रुपयांपेक्षा जास्त यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारणार; तीनशेपासून जास्त शुल्क आकारता येणार नाही; नियम कधीपासून लागू होणार
UPI : 0.4 टक्के MDRनुसार 75 हजार रुपयांच्या व्यवहारावर 300 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावरही MDR 300 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
UPI MDR : यूपीआय (UPI )व्यवहारांसंदर्भात मोठा निर्णय झाला आहे. 2 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या यूपीआय व्यवहारांवर आता 0.4 टक्केच म्हणजेच 40 बेसिस पाँइटस (MDR) आकारला जाणार आहे. पण प्रत्येक व्यवहारांसाठी एमडीआरची (MDR) कमाल मर्यादा (जास्तीत) मर्यादा तीनशे रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्यापेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. हा नियम 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलाय.
यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीची (UPI Steering Committee) 15 सप्टेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत 2 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRचा दर 0.4 टक्के निश्चित करण्यात आला आहे. उदाहरणार्थ 2 हजार रुपयांच्या व्यवहारावर 8 रुपये, तर 10 हजार रुपयांच्या व्यवहारावर 40 रुपये MDR लागू होईल.
75 हजारांवरील व्यवहारांवरही 300 रुपयांचीच मर्यादा
0.4 टक्के MDRनुसार 75 हजार रुपयांच्या व्यवहारावर 300 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावरही MDR 300 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. म्हणजेच 75 हजारांपेक्षा मोठ्या यूपीआय व्यवहारांसाठी कमाल शुल्क 300 रुपये इतकेच राहणार आहे.
खाणमाफियांच्या पळवाटांना ‘डिजिटल कुलूप’; फडणवीसांच्या हस्ते ‘महाखनिज 2.0’ पोर्टलचे उद्घाटन
एमडीआर म्हणजे काय ?
एमडीआर (MDR) म्हणजे डिजिटल पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्याकडून बँक किंवा संबंधित पेमेंट सेवा पुरवठादाराला दिले जाणारे शुल्क आहे.
काही महत्त्वाच्या क्षेत्रांना सवलत
ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी काही क्षेत्रांना या शुल्कातून विशेष सवलत देण्यात आलीय. दूरसंचार, रेल्वे, इंधन आणि विमा या श्रेणींसाठी MDR प्रति व्यवहार 5 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. तर कॅपिटल मार्केटशी संबंधित व्यवहारांसाठी MDR 0.02 टक्के ठेवण्यात आला आहे. या व्यवहारांची रक्कम तुलनेने मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र कमी दर निश्चित करण्यात आला आहे.
यूपीआय व्यवहारांमधून 16 हजार कोटींच्या उत्पन्नाची शक्यता
सुमारे 40 bps MDR लागू झाल्यानंतर UPI पेमेंट इकोसिस्टममधून दरवर्षी 16 हजार कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
या MDRमधून मिळणारे उत्पन्न UPI इकोसिस्टममधील विविध भागीदारांमध्ये विभागले जाणार आहे. यामध्ये खातेधारक बँका, लाभार्थी बँका, ग्राहकांच्या बाजूने काम करणाऱ्या PSP बँका, मर्चंट अक्वायरिंग पेमेंट अॅग्रीगेटर्स आणि NPCI यांचा समावेश आहे.NPCIला प्रत्येक व्यवहारासाठी स्विचिंग शुल्काच्या स्वरूपात निश्चित रक्कम मिळते.
PhonePe, Google Pay, Paytmशी संबंधित बँकांना फायदा?
PhonePe, Google Pay आणि Paytm यांसारखे UPI अॅप्स स्वतः UPI नेटवर्कशी थेट जोडलेले नसून बँकांच्या माध्यमातून ही सेवा देतात. या बँकांना PSP (Payment Service Provider) Banks म्हटले जाते. UPI इकोसिस्टमच्या यशामध्ये PSP बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याने MDRमधील त्यांचा वाटा कार्ड पेमेंट इकोसिस्टमच्या तुलनेत अधिक असण्याची शक्यता आहे. UPI इकोसिस्टममधील प्रमुख PSP बँकांमध्ये Yes Bank, Axis Bank, ICICI Bank, HDFC Bank आणि State Bank of India (SBI) यांचा समावेश आहे.दरम्यान, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार 2 हजार रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. तसेच RuPay डेबिट कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या पेमेंटवरही MDR आकारण्यास मनाई कायम आहे. UPI आणि देशांतर्गत RuPay कार्ड नेटवर्कचे संचालन NPCIकडून केले जाते.