Nagpur : पैशाच्या वादातून भाच्यांचा खून; मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमध्ये थरार

  • Written By: Published:
Nagpur : पैशाच्या वादातून भाच्यांचा खून; मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमध्ये थरार

Nagpur Crime : नागपूर येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे पैशाच्या वादातून मामानेच आपल्या दोन्ही भाच्यांचा चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका भाच्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला (Nagpur) तर दुसऱ्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत काली माता मंदिरासमोर गांधीबाग येथे घडली.

रवी राठोड आणि दीपक राठोड असे मृत्यू झालेल्या भाच्याची नावे आहेत. बदनसिंग राठोड असे आरोपी मामाचे नाव आहे. भर रस्त्यावर झालेल्या हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडल्याचे चित्र दिसत आहे. तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी व दीपक राठोड हे सख्खे भाऊ आहेत. दोघेही हंसापुरी भागात राहतात. त्यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचा आपला मामा बदनसिंग सोबत पैशाच्या व्यवहारातून वाद सुरू होता.

सरेंडर करण्याशिवाय पर्याय उरलाच नाही; वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला

पैसे देत नसल्यामुळे मामा चिडून होता. रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास मामाने आपला गांधीबागमध्ये भाचा रविवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. मामाचा अवतार बघून आपल्या भावाला वाचविण्यासाठी दीपकने धाव घेतली. मामाने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. दीपकला गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले मात्र दीपकचाही पहाटे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला

घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. रात्री एक वाजता पोलीस अधिकारीसुद्धा पोहोचले. जखमी दिपकवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होता. पहाटे चार वाजताच्या सुमारास दीपकचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक आणि रवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे गांधीबाग परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube