Nagpur : सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; नऊ जणांचा होरपळून मृत्यू

Nagpur : सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; नऊ जणांचा होरपळून मृत्यू

नागपूर : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची बातमी येत  आहे. या स्फोटात नऊ जण ठार झाले असून काही जण गंभीर जखमीही झाले आहेत. कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी ही घटना घडली असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली. ANI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Nine people were killed in a blast at Solar Explosive Company in Nagpur’s Bazargaon village)

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाजारगाव येथे प्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल संचालित सोलर ग्रुपची इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे दोन हजार एकरांमध्ये मोठे युनिट आहे. आहे. या कंपनीच्या सी बी एच 2 युनिटमध्ये कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगवेळी भीषण स्फोट झाला.

‘फडणवीस-महाजनांनी बदनामी केली म्हणून पक्ष सोडला’; नाथाभाऊंच्या तोंडी अपमानाच्या कटू आठवणी

या दुर्घटनेत सी बी एच 2 युनिटमध्ये कार्यरत असणाऱ्या 12 कामगारांपैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय सी बी एच 2 प्लांटची इमारत उद्धवस्त झाल्याचीही माहिती आहे. याच कंपनीत ऑगस्ट महिन्यातही काऊ साहित्याची विल्हेवाट लावताना आग लागली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पाच महिन्यांच्यात आतच दुसरी घटना घडली आहे.

लष्करप्रमुख भेट देण्याची शक्यता :

दरम्यान, या घटनेची माहितीम मिळताच राज्याचे माजी गृहमंत्री आणि काटोलचे विद्यमान आमदार अनिल देखमुख घटनास्थळी रवाना झाले आहेत. शिवाय काही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडेही नागपूरमध्येच आहेत. त्यामुळे तेही युनिटला भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन : लोकसभेपूर्वी PM मोदींचे गुजरातला सर्वात मोठे गिफ्ट

इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारी देशातील एक मोठी कंपनी आहे. इथून भारतीय लष्कर आणि नौदलासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचे उत्पादन होते. शिवाय अनेक शस्त्रास्त्रांची भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये निर्यात करण्यात येते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube