कॅनरा बँकेच्या मॅनेजरकडून 90 वर्षाच्या वृद्धाला गंडवण्याचा डाव, प्लॅन लिक होताच भांडाफोड

सुरुवातीला बँकेने सोशल मीडियावर कोरडे उत्तर देऊन प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. पण तसे होताना दिसत नाही.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 13T145436.485

पूर्वी माणसाची फसवणूक होते असे चारदोन क्षेत्र असाचे. (Pune) ते लोकांना ठळक माहितीही असायचे. पण आता असं राहिल नाही. हे फसवणुकीच चक्र एकदमच उलटं फिरलंय. आता फसवणूक न होणारे चारदोन क्षेत्र राहिलेत का असा प्रश्न पडावा इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात फसवणुकीच जाळं पसरलं आहे. यातही बँकिंग क्षेत्रात तर आग्रेसर झालय असंच म्हणण्याची परिस्थिती आहे. अनेकजण बँकेच्या मॅनेजरसह सर्वच लोकांना डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण आता नागपुरचीच घटना पहा किती धक्कादायक आहे. काय आहे ही घटना? चला जाणून घेऊ…

नापुरमधील कॅनरा बँकेच्या एका शाखेने ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला ‘टारगेट’ बनवून त्यांच्या आयुष्यभराची कमाई हडपण्याचा धक्कादायक प्रयत्न इथ उघड झालाय. ९० वर्षांच्या वृद्धाला चक्क ९९ वर्षांनंतर म्हणजे सन एकवीस हजार चोवीस (२१२४) मध्ये मॅच्युअर होणारी विमा पॉलिसी विकून बँकेने ‘मिस-सेलिंग’चा करुन गंडवलं आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर तेही समजून घेऊ.

तर झालं असं की, नागपूरमधील वेंकटचलम वी. अय्यर हे गेल्या अनेक दशकांपासून कॅनरा बँकेचे निष्ठावान ग्राहक आहेत. त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत शाखा व्यवस्थापकाने त्यांना २ लाख रुपये वार्षिक प्रीमियम असलेली एक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी गळी उतरवली.

धक्कादायक! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना गंडवले

यामध्ये ९० वर्षांच्या व्यक्तीला विमा मिळणं कठीण असल्याने मॅनेजरने एक ‘मास्टर प्लॅन’ आखला. आजोबांना त्यांच्या मुलीसोबत जॉइंट अकाउंट उघडायला लावलं. पॉलिसीमध्ये मुलीला ‘लाईफ अश्युअर्ड’ (विमाधारक) केले आणि वार्षिक २ लाखांचा हप्ता ९० वर्षांच्या वडिलांच्या खात्यातून कापला. ही पॉलिसी १०० वर्षांनंतर म्हणजे २१२४ मध्ये मॅच्युअर होणार होती. ९० वर्षांच्या व्यक्तीला ९९ वर्षांनंतर मिळणाऱ्या लाभाचे स्वप्न दाखवून आत्ताच लुटण्याचा हा प्रकार धक्कादायक प्रकार.

हे प्रकरण कसं समोर आलं तर, अय्यर यांच्या नातेवाईकाने (साकेत आर.) ‘X’ वर ही पोस्ट शेअर केल्यानंतर हा संतापजनक प्रकार जगासमोर आला. गेल्या वर्षी फेब्रुवारीत पहिली हप्ता कापला गेला. मात्र, दुसऱ्या हप्त्यासाठी बँकेचा फोन आल्यावर आजोबा घाबरले आणि त्यांनी कुटुंबाला ही माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार व्हायरल होताच नेटिझन्सनी कॅनरा बँक आणि IRDAI च्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सुरुवातीला बँकेने सोशल मीडियावर कोरडे उत्तर देऊन प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाढता दबाव आणि संताप पाहून बँकेचे प्रादेशिक प्रमुख आणि शाखा व्यवस्थापक रविवारी सुटीच्या दिवशी आजोबांच्या घरी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचे तातडीने निराकरण करण्याचे आणि एका आठवड्यात पूर्ण रक्कम परत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आता असे काही मॅनेजर तुम्हाला भेटले किंवा असं काही घडत असेल तर तुम्हीही सावध राहिल पाहिजे. बाकी, जाता जाता लेट्सअप मराठीला फेसबुकस, युट्युबवर फॉलो करायला विसरु नका.

follow us