Video : वॉशरूमच्या दारावर छत्रपती शिवाजी महारांजाचा फोटो, राज्यात संतापाची लाट

रिसॉर्ट नवीन वशिष्ठ आणि प्रदीप वशिष्ठ यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
Hariyana

हरियाणातील सिकरी येथे धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Shivaji Maharaj) येथील रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. थेट रिसॉर्टमधील वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर या महापुरुषांचे फोटो लावण्यात शिवभक्त आणि इतिहासप्रेमींमध्ये प्रचंड रोष निर्माण केला आहे.

सध्या सोशल मीडियावर या रिसॉर्टच्या वॉशरुम बाहेरील फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. या रिसॉर्टच्या वॉशरुममधील व्हिडीओ काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील सिकरी येथील ‘मिलन रिसॉर्ट’ (किंवा मिलन बँक्वेट हॉल) मध्ये पुरुषांच्या वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर महिलांच्या वॉशरूमच्या दरवाजावर राणी पद्मिनी (पद्मावती) यांचा फोटो लावण्यात आला होता.

Video : बोलणं कुठून सुरू करावं; दादांचा शोकप्रस्ताव मांडताना CM फडणवीस भावूक

हे फोटो लिंग दर्शवण्यासाठी म्हणून वापरण्यात आले होते, जे अत्यंत असंवेदनशील आणि अपमानास्पद मानले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. नेटकरींनी “महापुरुषांचा असा अवमान कदापि सहन केला जाणार नाही” असे म्हणत रिसॉर्ट प्रशासनावर टीका केली. सोशल मीडियावरील प्रचंड दबाव आणि शिवप्रेमींच्या निषेधामुळे रिसॉर्टच्या व्यवस्थापकांनी तात्काळ हे दोन्ही फोटो काढून टाकले. अधिक धक्कादायक म्हणजे, त्या जागी आता घोड्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

रिसॉर्ट नवीन वशिष्ठ आणि प्रदीप वशिष्ठ यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. काही ठिकाणी प्रदीप वशिष्ठ हे माजी संचालक असल्याचेही नमूद केले जात आहे. फोटो काढले असले तरीही, असा गंभीर अपमान होईपर्यंत रिसॉर्ट प्रशासन किंवा स्थानिक अधिकाऱ्यांचे लक्ष का गेले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अनेकांनी रिसॉर्ट मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

follow us