किड्या-मुंग्यांसारखी माणसं मारली, महादेव मुंडेंची फक्त 12 गुंठ्यासाठी…; धसांनी सगळंच काढलं

किड्या-मुंग्यांसारखी माणसं मारली, महादेव मुंडेंची फक्त 12 गुंठ्यासाठी…; धसांनी सगळंच काढलं

Suresh Dhas : बीडमधील (Beed) कायदा व सुव्यवस्थेवरुन भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कराड टोळीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बीडमध्ये कोणाचा खून कशासाठी केला? याची आमदार सुरेश धस यांनी यादीच वाचली. महादेव मुंडेंची (Mahadev Munde) १२ गुंठ्यासाठी हत्या करण्यात आल्याचं ते म्हणाले. यावेळी धसांनी ‘आका कमिंग सून’ असं सांगणाऱ्या कराड समर्थकांना चांगलचं सुनावलं.

केक कटींग अन् स्टेटस ठेवत झाली गायब; पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल 

सुरेश धस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजिंक्य गर्जे, संदीप तांदळे हे लोकप्रतिनिधींना धमक्या देतात, याविषयी विचारलं असता धस म्हणाले, धमक्या देणं, गुंडगिरी करणं ही त्यांची मानसिकता आहे. तुम्ही ज्यांची नावं घेता, त्यांच्याबद्दल काय बोलावं? ती फार किरकोळ लोकं आहे. त्यांचं संपूर्ण कंबरड लवकरच मोडल्या जाईल, असं धस म्हणाले. यावेळी धसांनी ‘आका कमिंग सून म्हणणाऱ्या कराड समर्थकांनाही सुनावलं. पाकिस्तानचे हत्तीवरून मिरवणूक काढणार आहेत म्हणे, दीडेक हजार पाकिस्तानचे सैनिक मारून आलेत की, काय मिरवणूक काढायला?, असा खोचक सवाल धसांनी केला.

किड्या-मुंग्यासारखी लोक मारली…
धस म्हणाले, या सर्व प्रकरणाची सुरूवात छत्रपती संभाजीनगरच्या पटेल हा पट्टेदारापासून झाली. चाळीस लाखातच पट्टेदाराला मिटवला. या लोकांनी किड्या – मुंग्यासारखं लोकांना मारलं. आणि आम्ही संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवला तर आमच्यावर जातीववादी म्हणत टीका केली जाते. संतोष देशमुख, महादेव मुंडे, बंडू मुंडे, बापू आंधळे,  संदीप दिघोळे, ही तुमचीच माणसं आहेत ना? तुम्ही तुमचेच माणसं मारताय… या प्रकणातही आम्ही आवाज उठवत आलोय.

न्या. यशवंत वर्मांना SC चा झटका, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली, महाभियोगाला हिरवा कंदील 

ज्यांच्यावर 307 चे गुन्हे, दरोड्याचे गुन्हे आहेत, ते लोक तुम्हाला कशासाठी लागतात. माणसं मारायला लागतात का?, असा सवाल धसांनी मुंडेंचं नाव न घेता केला.

महादेव मुंडे १२ गुंठ्यासाठी, बंडू मुंडे एक कोटीसाठी मारल्याचा दावाही धसांनी केला.

माणसं मारायची एकाने, फिर्याद तिसऱ्याने द्यायची, आरोपी चौथ्याला करायचं अन् जेलमध्ये पाचव्याला घालायचां, अशी परिस्थिती परळीत आहे. परळी सोडून यांनी पहिल्यांदा संतोष देशमुखांवर हात टाकला. त्यांनी मस्साजोगच्या नादी लागायला नको होतं. हे त्यांच्या नादी लागले. पण, धनंजय देशमुख अन् तिथले साक्षीदार हे सगळे स्ट्रॉंग आहेत,असं धस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube